भारतातील एकमेव शहर जिथे मांसाहारी पदार्थ खाणे गुन्हा; अंडी-मासे विकण्यावर बंदी; कोणी नियम तोडला तर...!

भारतातील कोणत्या शहरात तुम्ही मांसाहार अजिबात खाऊ शकत नाही? 

Pravin Dabholkar | Apr 14, 2025, 10:03 PM IST
twitter

Vegertarian City: भारतातील कोणत्या शहरात तुम्ही मांसाहार अजिबात खाऊ शकत नाही? 

1/9

भारतातील एकमेव शहर जिथे मांसाहारी पदार्थ खाणे गुन्हा; अंडी-मासे विकण्यावर बंदी; कोणी नियम तोडला तर...!

Indias Vegertarian City Where Non Veg Is Banned Palitana Marathi News

Vegertarian City: भारतात अनेक प्रकारचे मांसाहारी पदार्थ बनवले जातात. लोक ते मोठ्या आवडीने खातात, जरी येथील काही लोक मांस अजिबात खात नाहीत. पण आज भारतातील त्या शहराबद्दल जाणून घेऊया जे देशातील एकमेव 100 टक्के शुद्ध शाकाहारी शहर आहे.

twitter
2/9

मांस किंवा अंडी विकण्यासही बंदी

Indias Vegertarian City Where Non Veg Is Banned Palitana Marathi News

या शहरात अन्नासाठी प्राण्यांची हत्या करणे हा गुन्हा मानला जातो आणि येथे मांस किंवा अंडी विकण्यासही पूर्णपणे बंदी आहे. भारतातील कोणत्या शहरात तुम्ही मांसाहार अजिबात खाऊ शकत नाही? 

twitter
3/9

नियम तोडणाऱ्यांवर कारवाई

Indias Vegertarian City Where Non Veg Is Banned Palitana Marathi News

या शहराचे नाव पलिताना असून ते गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे जगातील पहिले शहर आहे जिथे मांसाहार पूर्णपणे बंदी आहे. मांस खाणे, ते विकणे आणि प्राण्यांना मारणे हे येथे गुन्हा मानला जातो. 

twitter
4/9

नियम मोडला तर कारवाई

Indias Vegertarian City Where Non Veg Is Banned Palitana Marathi News

हे शहर पूर्णपणे शाकाहारी घोषित करण्यात आलंय. पालिताना हे एक पवित्र शहर मानले जाते. त्यामुळे येथे कोणीही मांस विकू शकत नाही आणि कोणीही प्राण्यांची कत्तल करू शकत नाही. कोणी हा हा नियम मोडला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाईदेखील होऊ शकते.

twitter
5/9

प्राण्यांच्या हत्येवर बंदी

Indias Vegertarian City Where Non Veg Is Banned Palitana Marathi News

या शहरात मांस विकणे किंवा खाणे हा गुन्हा मानला जातो. 2014 मध्ये सरकारने या भागात प्राण्यांच्या हत्येवर बंदी घातली होती आणि तेव्हापासून येथे एकही प्राणी मारला गेलेला नाही. यामुळे या शहराला केवळ भारतातच नव्हे तर जगात एक वेगळी ओळख मिळाली आहे. ज्यामुळे येथे पर्यटकांची संख्याही वाढली आहे.

twitter
6/9

शत्रुंजय टेकड्यांवर 800 हून अधिक मंदिरे

Indias Vegertarian City Where Non Veg Is Banned Palitana Marathi News

पालिताना येथे जैन धर्माचे एक पवित्र तीर्थस्थळ आहे. याशिवाय शत्रुंजय टेकड्यांवर 800 हून अधिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध आदिनाथाचे मंदिर आहे.

twitter
7/9

शुद्ध शाकाहारी क्षेत्र

Indias Vegertarian City Where Non Veg Is Banned Palitana Marathi News

म्हणूनच या शहराला शुद्ध शाकाहारी क्षेत्र घोषित करण्यात आलंय. हे जगातील एकमेव शहर बनले आहे जिथे लोक शुद्ध शाकाहारी अन्न खातात. येथे येणाऱ्या सर्व भाविकांना ताटात फक्त शुद्ध शाकाहारी जेवण दिले जाते.

twitter
8/9

कसा झाला निर्णय?

Indias Vegertarian City Where Non Veg Is Banned Palitana Marathi News

200 जैन साधू आणि संतांच्या निषेधानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी येथील 200 हून अधिक मी' दुकाने बंद करण्याची मागणी केली होती. शहरात प्राणी हत्या होऊ नये असा त्यांचा विश्वास होता.

twitter
9/9

सजीव प्राण्याची हत्या करणे चुकीचे

Indias Vegertarian City Where Non Veg Is Banned Palitana Marathi News

जैन समाजात कोणत्याही सजीव प्राण्याची हत्या करणे चुकीचे मानले जाते. या समुदायाचे लोक मांसाहाराला विरोध करतात. त्यामुळे पालितानामध्ये त्यावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.

twitter