IPL 2023 : आयपीएल स्पर्धेवर कोरोनाचं सावट, बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

IPL 2023 : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलला (IPL) 31 मार्चपासून सुरुवात झाली. आता स्पर्धेला सात दिवस उलटून गेले असून आतापर्यंत नऊ सामने खेळवले गेले आहेत. सर्व सामन्यांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. पण एका गोष्टीने आयपीएल चाहत्यांची चिंता वाढवली आहे. देशात कोरोनाच्या (Corona) दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ झाल्याने आयपीएल स्पर्धेवरही कोरोनाचं सावट पसरलं आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे.

Apr 06, 2023, 16:18 PM IST
1/6

देशात गेल्या 24 तासात तब्बल 5,335 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. 195 दिवसांनंतर कोरोना रुग्ण इतक्या मोठ्या प्रमाणावर सापडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याआधी 23 सप्टेंबर 2022 रोजी 5,383 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

2/6

देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आयपीएल स्पर्धेवरही कोरोनाचं सावट पसरलंय. गेल्या वर्षी कोरोनामुळे स्पर्धा मध्येच थांबवून दुबईत खेळवण्यात आली होती. 

3/6

बीसीसीआयने ही गोष्ट गांभीर्याने घेतील आहे. आयपीएलमधल्या सर्व फ्रँचाईजी, स्टाफ आणि खेळाडूंना बीसीसीआयने सूचना केल्या आहेत. सर्वांना सतर्क आणि खबरदारी बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

4/6

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना गाईडलाईन्सचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी चिंतेचं कारण नसल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. 

5/6

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंचं आरोग्य आणि सुरक्षेसाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन केलं जात असून कोरोनाच्या सद्यस्थितीवरही लक्ष ठेवलं जात आहे. 

6/6

आयपीएलमध्ये कोरोनाने एन्ट्री केलीय. क्रिकेट समालोचक आकाश चोपडा यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. युट्यूब कम्यूनिटी पोस्टवर त्याने एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.