मुंबईविरुद्ध 77* धावा करुनही यशस्वीचं 'शतक' कसं झालं? असा चौथाच प्लेअर ज्याने...

IPL 2026 Yashasvi Jaiswal Unique Century: 77 धावा करुन अगदी पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जयसवालने एक अत्यंत अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर करुन घेतसा आहे. अशी कामगिरी आतापर्यंत केवळ तीन जणांना जमली असून जयसवाल या यादीतील चौथा खेळाडू ठरलाय. याबद्दलच जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Apr 08, 2026, 09:47 AM IST
twitter
1/11

यशस्वी ठरला असा चौथा खेळाडू ज्याने...

ipl2026yashasvijaiswal

मैदानातील आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर यशस्वी जयसवालने अगदी अनोख्या विक्रमला गवसणी घासली असून त्याने केलाय तो पराक्रम करणारे तीन खेळाडू आहेत. यशस्वीने नेमकं केलंय काय पाहूयात...

twitter
2/11

जयसवालने धावांचा पाऊस पडला

ipl2026yashasvijaiswal

इंडियन प्रिमिअर लीगच्या 2026 सत्रामधील 13 व्या सामन्यात, यशस्वी जयसवालने आपल्या फलंदाजीने धावांचा पाऊस पडला. आपल्या आक्रमक खेळीमध्ये यशस्वीने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवत मान्यवरांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. 

twitter
3/11

सलामीच्या जोडीचा धुमाकूळ

ipl2026yashasvijaiswal

गुवाहाटीमध्ये पावसामुळे राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सदरम्यानचा सामना उशिरा सुरू झाल्याने प्रत्येकी 11 ओव्हरचा खेळवण्यात आला. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या सलामीच्या जोडीने हे आव्हान आनंदाने स्वीकारले.

twitter
4/11

पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा

ipl2026yashasvijaiswal

पहिल्याच ओव्हरपासून यशस्वी जयसवालने धावांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. जयसवालने दीपक चहरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा काढल्या. त्यानंतर, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने जगातील अव्वल दर्जाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचे स्वागत षटकार ठोकत केलं अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

twitter
5/11

सूर्यवंशी 14 चेंडूंत 39 धावा

ipl2026yashasvijaiswal

11 षटकांच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, राजस्थान रॉयल्सने स्कोअरबोर्डवर 150 धावांचा डोंगर उभा केला. वैभव सूर्यवंशी 14 चेंडूंत 39 धावा काढून बाद झाला. त्याने पाच सिक्स आणि एक चौकार लगावला. म्हणजेच 39 पैकी 34 धावा सूर्यवंशीने बॉण्ड्रीच्या माध्यमातून जमवल्या.

twitter
6/11

आक्रमक खेळी कायम ठेवत...

ipl2026yashasvijaiswal

सूर्यवंशी बाद झाल्यानंतरही सलामीवीर यशस्वी जयसवालने आपली आक्रमक खेळी कायम ठेवत मुंबईच्या गोलंदाजीची पिसं काढली. जयसवालने 32 बॉलमध्ये नाबाद 77 धावांची शानदार खेळी केली.  

twitter
7/11

पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला

ipl2026yashasvijaiswal

यशस्वी जयसवालने 240.63 च्या सरासरीने चार षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत नाबाद राहत संघाच्या एकूण धावसंख्येच्या अर्ध्याहून अधिक धावा एकट्यानेच केल्या.  

twitter
8/11

अनोखं शतक

ipl2026yashasvijaiswal

या खेळीदरम्यान, यशस्वी जयसवालने एक अनोखं शतक झळकावलं. आपल्या कामगिरीने यशस्वीने काही मोजक्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळालं आहे.  

twitter
9/11

केवळ चौथा असा खेळाडू ज्याने...

ipl2026yashasvijaiswal

यशस्वी जयसवाल हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 100 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. हा पराक्रम करणारा यशस्वी जयसवाल हा केवळ चौथा खेळाडू ठरला आहे.

twitter
10/11

यादीत आधीपासूनच तिघांचा समावेश

ipl2026yashasvijaiswal

यशस्वी जयसवालआधी संजू सॅमसन, जोस बटलर आणि शेन वॉटसन या प्रत्येकाने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 100 हून अधिक षटकार लगावले होते.   

twitter
11/11

अव्वल स्थानी संजू सॅमसन, त्याने किती सिक्स मारलेत?

ipl2026yashasvijaiswal

जॉस बटलरने राजस्थानकडून खेळताना 135 तर शेन वॉटसनने 109 षटकार लगावले आहेत. हे दोघेही सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या राजस्थानच्या खेळाडूंच्या यादीत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहे. या यादीत संजू सॅमसन अव्वल स्थानी आहे. त्याने राजस्थानच्या फ्रँचायझीसाठी 192 षटकार ठोकले आहेत. (सर्व फोटो सोशल मीडिया आणि जिओ हॉटस्टारवरुन साभार)

twitter