स्वागत नही करोगे हमारा! ICC च्या अध्यक्षपदी जय शाह आजपासून रुजू, मिळणार एवढं मानधन
Jay Shah ICC Chairman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी 1 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांची आयसीसीच्या अध्यक्ष पदासाठी निवड झाली होती. मात्र आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने जय शाह यांचा कार्यकाळ हा 1 डिसेंबर पासून सुरु झाला. आयसीसीचे अध्यक्षपद भूषविणारे जय शाह हे पाचवे भारतीय ठरले आहेत.
1/7
जय शाह यांच्याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या भारतीय व्यक्तींनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवलंय होतं. अध्यक्षपदी निवड झालेले जय शाह हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. ऑगस्ट महिन्यात आयसीसी अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु असताना जय शाह यांचे नाव आघाडीवर होते.
2/7
3/7
जय शाह यांची कारकीर्द :
जय शाह यांनी 2009 मध्ये क्रिकेट प्रशासनात एंट्री घेतली यावेळी त्यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद भूषवले. त्यानंतर 2015 साली जय शाह यांनी बीसीसीआयमध्ये सहभागी घेतला. नंतर सप्टेंबर 2019 मध्ये ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे सचिव झाले आणि आता 2024 मध्ये आयसीसीचे अध्यक्ष झाले आहेत.
4/7
5/7
जय शाह यांना किती मानधन मिळणार?
6/7