close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत कल्याणच्या सुश्मिताची बाजी

इतिहास घडलेल्या ऐतिहासिक शहर असणाऱ्या कल्याणने पुन्हा एकदा यशाचे शिखर गाठले आहे.

Jun 25, 2019, 08:18 AM IST

कल्याण : इतिहास घडलेल्या ऐतिहासिक शहर असणाऱ्या कल्याणने पुन्हा एकदा यशाचे शिखर गाठले आहे. कल्याणच्या सुश्मिता सिंगने आपल्या पहिल्याच प्रयत्नात थेट जागतिक सौंदर्यस्पर्धेच्या किताबावर आपले नाव कोरले. या यशामुळे सुश्मिताच्या आणि संपूर्ण कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. काही दिवसांपूर्वी लॅटिन अमेरिकेत पार पडलेल्या 'मिस टिन वर्ल्ड २०१९' या जागतिक सौंदर्यस्पर्धेत तिने हे यश संपादन केलं. त्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुश्मिताने आपल्या बुद्धीचातुर्य आणि सादरीकरणाच्या जोरावर विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. 

1/5

आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत कल्याणच्या सुश्मिताची बाजी

आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत कल्याणच्या सुश्मिताची बाजी

कल्याण शहराचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर उंचावलेल्या सुश्मिताच्या या कामगिरीचा गौरव करण्यासाठी खास सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

2/5

आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत कल्याणच्या सुश्मिताची बाजी

आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत कल्याणच्या सुश्मिताची बाजी

कल्याण बिझनेस कम्युनिटीसह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

3/5

आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत कल्याणच्या सुश्मिताची बाजी

आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत कल्याणच्या सुश्मिताची बाजी

राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि इतर मंडळींनी आपल्या भाषणात सुश्मिताचे भरभरून कौतुक केले.  

4/5

आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत कल्याणच्या सुश्मिताची बाजी

आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत कल्याणच्या सुश्मिताची बाजी

'मिस टिन वर्ल्ड' नंतर 'मिस वर्ल्ड'चा किताबही सुश्मिताने मिळवावा अशी अपेक्षा देखील व्यक्त करत तिला शुभेच्छा दिल्या.   

5/5

आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत कल्याणच्या सुश्मिताची बाजी

आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत कल्याणच्या सुश्मिताची बाजी

हा हृदयस्पर्शी सोहळा पाहून सुश्मिताही भावुक झाली. (छाया सौजन्य फेसबूक वॉल)