Kane Williamson: केन विलियम्सनची 'बॅक टू बॅक' शतकं; विराटनंतर रूटलाही सोडलं मागे

Kane Williamson: दक्षिण आफ्रिका विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या पहिला टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यामध्ये न्यूझीलंडची टीम मजबूत स्थितीत दिसून येतेय. 

| Feb 06, 2024, 17:41 PM IST
1/7

न्यूझीलंडने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत केन विलियम्सन याच्या शतकी खेळीच्या जोरावर 528 रन्सची आघाडी घेतली आहे.

2/7

मुख्य म्हणजे या सामन्यात टेस्ट टीमचा माजी कर्णधार केन विलियम्सन चांगल्याच फॉर्ममध्ये दिसून येतोय.

3/7

केन विलियम्सनने या सामन्यातील पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही शतक ठोकलंय. 

4/7

केनने दुसऱ्या डावात 109 रन्सची उत्तम खेळी केली. यावेळी त्याने 12 चौकार लगावले आहेत. 

5/7

केनच्या टेस्ट कारकीर्दीतील हे 31 वं शतक ठरलंय. केनने आता विराट कोहलीनंतर आता इंग्लंडच्या जो रुट यालाही मागे टाकलं आहे.

6/7

इंग्लडच्या जो रुटच्या नावावर 30 शतकं आहेत. 

7/7

पहिल्या डावातील शतकासह केनने विराटला मागे टाकलं. विराटच्या नावावर टेस्टमध्ये 29 शतकांची नोंद आहे.