सातारा जिल्ह्यातील कास पठार पर्यटकांसाठी खुलं; दुर्मिळ फुलांना बहर

साता-यातील कास पठार दुर्मिळ फुलांनी बहरलं आहे. पठार पर्यटकांसाठी खुलं करण्यात आले आहे. 

Sep 16, 2023, 20:38 PM IST

Kaas Pathar Satara : पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दुर्मिळ फुलांसाठी प्रसिद्ध असलेलं साता-याचं कास पठार पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय. येथे पर्यटकांची गर्दी होवू लागली आहे. येथील रंगीबेरंगी फुल पर्यटकांना आकर्षित करत आहत. 

 

1/7

निसर्गाने मुक्त हस्ताने रंगाची उधळण केलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठार अशा रंगीबेरंगी दुर्मिळ फुलांनी बहरलंय.

2/7

कास पठार अनेक दुर्मिळ जैवविविधतेचे ठिकाण असल्यानं त्याच्या सुरक्षेसाठी आणि संवर्धनासाठी वनविभाग आणि स्थानिक नागरिक प्रयत्नशील आहेत. 

3/7

कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे 22 किलोमीटर अंतरावर आहे.

4/7

सप्टेंबर महिन्यात हे कास पठार दुर्मीळ फुलांनी फुलून जातं. ही दुर्मिळ फुलं पाहण्यासाठी देशातूनच नाही तर परदेशातूनही असंख्य पर्यटक येत असतात.

5/7

 जागतिक वारसास्थळ आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ अशी कास पठारची ओळख आहे 

6/7

या कास पठारावर आता 30 ते 35 प्रकारची दुर्मिळ फुले पाहायला मिळतात. 

7/7

16 सप्टेंबरपासून हे पठार पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.