close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कविता पती रोनितसोबत घेत आहे सुट्ट्यांचा आनंद, फोटो व्हायरल

कविताने काही फोटो सोशल मी़डियावर पोस्ट केले आहेत

Apr 15, 2019, 14:19 PM IST

मुंबई : 'एफआयआर' मालिका फेम अभिनेत्री कविता कौशिक सध्या तिचे पती रोनित बिस्वास सोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. कविताने काही फोटो सोशल मी़डियावर पोस्ट केले आहेत. सध्या भले ती कलाविश्वापासुन लांब असली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपली खुशाली कळवत असते. तिच्या दिलखेचक आदा पाहुण चाहते तिला पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचा आग्रह करत आहेत. 

तिने फोटो शेअर केल्यानंतर क्षणार्धात नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. 'चंद्रमुखी चौटाला' तू लवकर एक अभिनयाकडे वळ..' तर दुसरीकडे 'चंद्रमुखी तूला पाहून फार दिवस झाले त्यामुळे  माझे मन विचलित होत आहे.' अशा अनेक प्रतिक्रिया तिचे चाहते देताना दिसत आहेत. दोन वर्षांपूर्वी कवीताने तिच्या बालपणीचा मित्र रोनितसोबत लग्न केले आहे. 

1/4

छोट्या पडद्यावरील चंद्रमुखीने तिच्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केले होते. कवीता सध्या तिच्या वैवाहिक जीवनात व्यस्त आहे.

2/4

कविताचा जन्म काशीपूर येथे झाला होता.

कॉलेज दिवसात कविताला सूत्रसंचालनाची आवड होती. २००१ साली एकता कपूरच्या शोमध्ये तिची निवड करण्यात आल्या नंतर ती मुंबईमध्ये आली.  

3/4

उत्तराखंडाच्या कविताला 'एफआयआर' मालिकेच्या मध्यमातूम लोकप्रियता मिळाली. 

4/4

कविता कौशिक सध्या तिच्या पती सोबत घेत आहे सुट्ट्यांचा आनंद

कविता आणि रोनित दोघे शिव शंकराचे फार मोठे भक्त आहेत. त्यामुळे या दोघांनी हिमालयात असलेल्या शिव आणि पार्वतीच्या मंदिरात लग्न गाठ बांधली.