नेटकऱ्यांना खटकलं त्यांचं इंटिमेट फोटोशूट; उत्तर देत कपल म्हणतं...

Oct 20, 2020, 09:54 AM IST
1/5

नेटकऱ्यांना खटकलं त्यांचं इंटिमेट फोटोशूट; उत्तर देत कपल म्हणतं...

प्री वेडिंग आणि पोस्ट वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड गेल्या काही दिवसांमध्ये चांगलाच स्थिरावला आहे. मुख्य म्हणजे फोटोग्राफरचं कसब यातून अनेकांनाच भारावून टाकतं. विविध कल्पना अंमलात आणत त्या अनुशंगानं काढलेले फोटो म्हणजे आयुष्यभराची आठवणच. पण, सध्या मात्र सोशल मीडियावर एक जोडी त्यांच्या अशाच एका फोटोशूटमुळं काहीजणांच्या रोषाला सामोरी जात आहे.  

2/5

नेटकऱ्यांना खटकलं त्यांचं इंटिमेट फोटोशूट; उत्तर देत कपल म्हणतं...

boudoir sessionच्या इंटिमेट फोटोशूटच्या संकल्पनेसह ऋषी आणि लक्ष्मी या केरळमधील कपलनं त्यांचं पोस्ट वेडिंग फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला.  १६ सप्टेंबरला हे दोघंही विवाहबंधनात अडकले. पण, कोविडच्या संकटामुळं त्यांनी कोणत्याही प्रकारचं प्री वेडिंग शूट अथवा मोठ्या समारंभाचं आयोजनही केलं नव्हतं. त्यामुळं त्यांनी एका अनोख्या अंदाजात हे पोस्ट वेडिंग फोटोशूट करण्याचं ठरवलं. केरळमधीलच इडुक्की येथील चहाच्या मळ्यांमध्ये या जोडीनं हे पोस्ट वेडिंग फोटोशूट करुन घेतलं. 

3/5

नेटकऱ्यांना खटकलं त्यांचं इंटिमेट फोटोशूट; उत्तर देत कपल म्हणतं...

माध्यमांशी संवाद साधताना पारंपरिक अशा वेष्टी आणि साडीमध्ये आपल्याला फोटोशूट करायचं नव्हतं, त्यामुळं काहीतरी वेगळं करण्याकडेच आपला कल होता अशी माहिती ऋषीनं दिली. पण, फोटोशूटमधील काही सुरेख आणि तितकेच लक्षवेधी फोटो पोस्ट केल्यानंतर मात्र या जोडीला जोरदार टीकेचा सामना करावा लागला. वाईट शब्दांतील टीकेचा भडीमार त्यांच्यावर करण्यात आला. अतिशय चुकीच्या पद्धतीनं हे फोटो शेअर करण्यात आल्याचं म्हणतही त्यांच्यावर आगपाखड करण्यात आली. 

4/5

नेटकऱ्यांना खटकलं त्यांचं इंटिमेट फोटोशूट; उत्तर देत कपल म्हणतं...

पण, फोटोंमध्ये दिसणाऱ्या या दोघांच्या केमिस्ट्रीला वेगळंच नाव देण्यात आलं. आपण दोघांनीही शूटसाठी पूर्ण कपडे घातले होते. मुळात एखाद्या सार्वजनिक ठिकाणी फोटोशूट करत असताना कमी कपड्यांमध्ये वावरणंच अशक्य आहे. पण, असे फोटो टीपण्याचं सुरेख कसब फोटोग्राफरला अवगत होतं आणि त्यानं तितकेच छान फोटो टीपलेही. पण, माला आणि माझ्या पत्नीला मात्र अनेकांच्या विचित्र टीकांना सामोरं जावं लागलं, असं ऋषी म्हणाला. 

5/5

नेटकऱ्यांना खटकलं त्यांचं इंटिमेट फोटोशूट; उत्तर देत कपल म्हणतं...

फक्त नेटकरीच नव्हे, तर शेजारी आणि नातेवाईकांनीही या जोडीवर निशाणा साधला. पण, या साऱ्यामध्ये लक्ष्मी आणि ऋषी या दोघांनीही हे फोटो सोशल मीडियावरून न हटवण्याचा आणि ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय़ घेतला. एक - दोन दिवसांच या चर्चा शमतील. त्यामुळं खिल्ली देणाऱ्यांना उत्तरं देत मला माझा वेळ वाया घालवायचा नाही, असं ऋषीनं स्पष्ट केलं.  (सर्व छायाचित्रं- सोशल मीडिया)