कोर्टापासून ते स्वत:च्या घरापर्यंत सिया गोयल अनेकदा पोलिसांच्या ताब्यात असताना एकाच काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या स्वेटशर्टमध्ये दिसून आली. या स्वेटशर्टची किंमत किती आहे ठाऊक आहे का?
1/8सिया गोयलच्या स्वेटशर्टची किंमत सध्या चर्चेत असून हे शर्ट दिसत साधं असलं तरी ते परदेशी कंपनीचं आहे. या शर्टची किंमत आपल्यापैकी अनेकांच्या एका महिन्याच्या पगारापेक्षाही अधिक आहे. जाणून घेऊयात नेमकी किती आहे या शर्टची किंमत...
2/8केतन अगरवाल हत्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना शुक्रवारी 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (सर्व फोटो सोशल मीडिया आणि वृत्तसंस्थांकडून साभार)
3/8शुक्रवारी सिया आणि चेतन यांना वडगावमधील कोर्टात हजर करण्यात आलं. त्यापूर्वी आदल्या दिवशी सियाला पोलीस तिच्या घरी घेऊन गेले होते. तिथे त्यांनी ज्या दिवशी केतनला सिंहगडावरुन सियाने धक्का देऊन मारलं त्या दिवशी परिधान केलेले कपडे जप्त केले. (सर्व फोटो सोशल मीडिया आणि वृत्तसंस्थांकडून साभार)
4/8मात्र सिया अटकेत असल्यापासून अनेकदा एकाच पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या स्वेटशर्टमध्ये दिसत आहे. (सर्व फोटो सोशल मीडिया आणि वृत्तसंस्थांकडून साभार)
5/8झाकलेला चेहरा आणि पांढऱ्या, काळ्या रंगाचा शर्ट याच अवतारामध्ये सिया पोलिसांच्या ताब्यात असल्यापासून समोर आलेली आहे. (सर्व फोटो सोशल मीडिया आणि वृत्तसंस्थांकडून साभार)
6/8मात्र सिया परिधान करत असलेलं हे शर्ट साधं नाही. हे एक ब्रँडेड कंपनीचं शर्ट असून त्याची किंमत वाचूनच तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. (सर्व फोटो सोशल मीडिया आणि वृत्तसंस्थांकडून साभार)
7/8सिया ज्या पांढऱ्या आणि काळ्या शर्टमध्ये पोलिसांसोबत अगदी कोर्टापासून ते घरापर्यंत दिसली ते शर्ट फ्रान्समधील एका नामांकित कंपनीचं आहे. (सर्व फोटो सोशल मीडिया आणि वृत्तसंस्थांकडून साभार)
8/8सिया पोलीस कोठडीत असताना वापरत असलेल्या या एका शर्टाची किंमत 30 हजार रुपये इतकी आहे. ही रक्कम अनेकांच्या महिन्याच्या पगारापेक्षाही अधिक आहे. (सर्व फोटो सोशल मीडिया आणि वृत्तसंस्थांकडून साभार)