जाणून घ्या खिचडी, भाताशिवाय राहू न शकणाऱ्या करीनाच्या डाएट प्लॅनविषयी

May 22, 2019, 07:56 AM IST
1/6

जाणून घ्या खिचडी, भाताशिवाय राहू न शकणाऱ्या करीनाच्या डाएट प्लॅनविषयी

कलाविश्व किंवा एकंदर अभिनय क्षेत्रात चेहऱ्याच्या सौंदर्याला महत्त्व दिलं जाण्यासोबतच शारीरिक सुदृढताही तितकीच महत्त्वाची असते. व्यग्र वेळापत्रक, चित्रीकरणाच्या अनिश्चित वेळा या साऱ्यातही कलाकार मंडळींना त्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. मुख्य म्हणजे ही सारी तारेवरची कसरत सुरु असताना कालाकार मंडळी त्यांच्या शारीरिक सुदृढतेलाही प्राधान्य देतात. फिटनेस फंडा जपणाऱ्या अशाच काही सेलिब्रिटींच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेत्री करिना कपूर खान. 

2/6

जाणून घ्या खिचडी, भाताशिवाय राहू न शकणाऱ्या करीनाच्या डाएट प्लॅनविषयी

करिनाने नेहमीच तिच्या विविध रुपांमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मग ते अगदी झिरो फिगर असो किंवा मग नियमित व्यायाम करण्याच्या तिच्या सवयी असो. यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणखी एक घटक म्हणजे करीनाच्या खाण्यापिण्याच्या सवयी. आता अभिनेत्री म्हटलं की डाएट आलं आणि डाएट म्हटलं की सॅलड, ग्रीन टी वगैरे वगैरेचा उल्लेख आलाच. पण, करीनाच्या डाएटच्या व्याख्या जरा वेगळ्या आहेत. तिनेच याविषयीचा खुलासा केला आहे. 

3/6

जाणून घ्या खिचडी, भाताशिवाय राहू न शकणाऱ्या करीनाच्या डाएट प्लॅनविषयी

'टाईम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्यासह एका सत्रात चाहत्यांशी संवाद साधताना तिने याविषयीच्या काही समजूती मोडित काढल्या आणि सर्वांचं लक्ष वेधलं. डाएट म्हटल्यावर सर्वात पहिली बंदीची गदा येते ती म्हणते भातावर. पण, आपण भाताशिवाय आपलं पान काही हलत नाही, असं खुद्द करीनाच म्हणते. फक्त आपणच नव्हे, तर सैफही भात खाणं काही सोडू शकत नाही, याचाही तिने खुलासा केला. 

4/6

जाणून घ्या खिचडी, भाताशिवाय राहू न शकणाऱ्या करीनाच्या डाएट प्लॅनविषयी

भात सोडून डाएट करण्याच्या विचारात असाल, तर करीनाचे हे उदगार नक्की आठवा. खिचडी हा सर्वात परिपूर्ण खाद्यपदार्थ असून, वारंवार या पदार्थाचं सेवन करण्याला करीना प्राधान्य देते. शिवाय वजन कमी करु इच्छिणाऱ्यांसाठी स्थानिक खाद्यपदार्थ आणि घरच्या घरी तयार करण्यात आलेल्या पदार्थांचं सेवन करण्याचाच सल्ला ती देते. 

5/6

जाणून घ्या खिचडी, भाताशिवाय राहू न शकणाऱ्या करीनाच्या डाएट प्लॅनविषयी

संतुलित आहाराच्या सवयींसोबतच नियमित व्यायाम आणि वेळच्या वेळी पुरेशी झोप या गोष्टींनाही आपण तितकंच महत्त्वं देत असल्याचं तिने यावेळी स्पष्ट केलं. या तीन गोष्टींचा आपल्या शारीरिक सुदृढतेवर बराच परिणाम असल्याचं तिने स्पष्ट केलं. वाफवलेल्या आणि उकडलेल्या खाद्यपदार्थांचं सेवन करण्यालाही बी टाऊनच्या या बेगमचं प्राधान्य आहे. 

6/6

जाणून घ्या खिचडी, भाताशिवाय राहू न शकणाऱ्या करीनाच्या डाएट प्लॅनविषयी

नाचणी आणि इतर धान्यांपासून तयार करण्यात आलेले ब्रेडचे प्रकार, भाज्या यांचं सेवन करत करीना प्रवासदौऱ्यांमध्येही डाळ- भात अशाच आहाराला प्राधान्य देते. भलत्याच प्रकारचे डाएट पाळणं हा तिच्या दिनचर्येचा भाग नाही. त्यामुळे संतुलित आहारासोबतच साधं आणि तितकच सकस खाणं तुम्हाला सुदृढ राहण्यास मदतीचं ठरु शकतं हा सल्ला देणाऱ्या करीनाचा हा फिटनेस फंडा आहे की नाही अगदी सोपा आणि पटण्याजोगा?