Year Ender 2024 : निर्मात्यांचे कोट्यावधींचे नुकसान, 'या' वर्षातील चित्रपटांना मोठ-मोठे कलाकारही वाचवू शकले नाहीत

कधीही चित्रपट बनवताना निर्माते सगळ्याच गोष्टींचा विचार करतात, कारण अर्थात त्यांचे संपूर्ण पैसे त्यात लागलेले असतात. असे अनेक चित्रपट आहेत ज्यांचं बजेट हे खूप होतं तरी सुद्धा ते बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकले नाही. दरम्यान, या वर्षी असे काही चित्रपट ठरलेत ज्यांना मोठे कलाकार देखील फ्लॉप होण्यापासून वाचवू शकले नाही. तर हे कोणते चित्रपट आहेत, त्यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊया...

| Dec 14, 2024, 19:05 PM IST
1/7

वेट्टैयन

रजनीकांत यांचा 'वेट्टैयन' या चित्रपटाचं बजेट हे 160 कोटी होतं. पण हा चित्रपट प्रेक्षकांचं मन जिंकण्यात अपयशी ठरला.   

2/7

कंगूवा

दाक्षिणात्य अभिनेता सूर्या आणि बॉबी देओलच्या 'कंगूवा' या चित्रपटाचं बजेट हे 350 कोटी होतं. पण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फक्त 70.2 कोटींची कमाई केली.   

3/7

इंडियन 2

कमल हासन यांच्या 'इंडियन 2' हा चित्रपट थिएटरमध्ये अपयशी ठरला. या चित्रपटाचं बजेट हे 250 कोटी होतं पण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 81.32 कोटींची कमाई केली. 

4/7

बडे मिया छोटे मिया

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या 'बडे मिया छोटे मिया' या चित्रपटाचं बजेट हे 350 कोटी होतं. पण चित्रपटानं फक्त 65.96 कोटींची कमाई केली. 

5/7

दाक्षिणात्य चित्रपट थंगलानला घेऊन लोकांमध्ये खूप क्रेझ होती. या चित्रपटाचं बजेट हे 135 कोटी होतं आणि प्रदर्शनानंतर या चित्रपटानं 45 कोटींचं कलेक्शन केलं.

6/7

या चित्रपटांमध्ये लोकप्रिय कलाकार असले तरी ते त्यांच्या निर्मात्यांचे पैसे मिळवू शकले नाही. त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. 

7/7

2024 या वर्षात अनेक गाजलेले चित्रपट देखील प्रदर्शित झाले, मात्र ज्या चित्रपटांची किंवा कलाकारांकडून प्रेक्षकांना आशा होती ते फ्लॉप ठरले आहेत.