मतदान जनजागृतीसाठी ५ किमी लांबीची मानवी साखळी

Apr 26, 2019, 15:25 PM IST
1/4

राजस्थानमधील कोटामध्ये मतदानासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून एक अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. एकाच वेळी हजारो लोकांनी ५ किलोमीटर लांबीची मानवी साखळी तयार करण्याचा रेकॉर्ड केला आहे. 

2/4

निवडणूक आयोग लोकांना मतदानासाठी जागरुक करण्यासाठीचे अनेक प्रयत्न करत आहे. परंतु हा मानवी साखळीचा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ५ किलोमीटर लांबींची मानवी साखळी तयार करण्यात आली होती. या मानवी साखळीत एअर बलूनही सोडण्यात आले. 

3/4

कोटा शहरातील उम्मेद स्टेडियमपासून चंबल गार्डनपर्यंतच्या रस्त्यावर ही साखळी तयार करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या या प्रयोगात कोटामधील प्रत्येक वर्गातील तसेच प्रत्येक संघटनांच्या लोकांनी सहभाग घेतला होता. अनेक लोक शहरातील रस्त्यांवर उतरुन या मानवी साखळीचा भाग बनले होते. 

4/4

निवडणूक आयोगाच्या या अनोख्या प्रयोगाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. या प्रयोगाची बुल ऑफ इंडिया रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.