लाडकी बहिण योजनेतून लाखो महिला अपात्र होण्यामागची कारणं अखेर समोर; मुद्दे अजब गजब

Written BySayali Patil
Published: Jun 02, 2026, 12:18 PM IST|Updated: Jun 02, 2026, 12:18 PM IST

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेतून लाखो बहिणी अपात्र. काय आहे त्यामागचं कारण? 

 

Ladki Bahin Yojana reasons why women Disqualify for scheme1/8

आर्थिक पाठबळ

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्याचा मनसुबा केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र राज्य शासनानं लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र याच योजनेतून लाखो महिला पुनपडताळणी प्रक्रियेत अपात्र ठरल्याचं समोर आलं. 

Ladki Bahin Yojana reasons why women Disqualify for scheme2/8

निकष

योजनेअंतर्गत अपात्रतेसाठीसुद्धा शासनानं काही निकष निर्धारित करत त्या धर्तीवर योजनेतील लाभार्थींची पुनर्पडताळणी आणि ई केवायसी करण्यात आली. ज्यातून अपात्रतेची कारणं आणि आकडेवारीसुद्धा समोर आली. 

 

Ladki Bahin Yojana reasons why women Disqualify for scheme3/8

आर्थिक उत्पन्न

आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक असून किंबहुना आयकर भरत असूनही अनेक नोकरदार महिलांनीसुद्धा योजनेला लाभ घेतला. अशा 10 लाख महिलासुद्धा अपात्र. 

Ladki Bahin Yojana reasons why women Disqualify for scheme4/8

सदस्य

कुटुंबातील एक सदस्य नोकरी करत असल्याचं दाखवत 4.5 लाख महिलांनी आर्थिक लाभ घेतला, ज्या आता अपात्र ठरल्या आहेत. 

Ladki Bahin Yojana reasons why women Disqualify for scheme5/8

आर्थिक सुबत्ता

आर्थिक सुबत्ता असून किंबहुना अगदी 4 चाकी वाहन असणाऱ्या दोन लाख महिलांनीही योजनेसाठी नावनोंदणी केल्यानं अशा महिला आता योजनेस अपात्र ठरल्या आहेत. 

Ladki Bahin Yojana reasons why women Disqualify for scheme6/8

लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 16 हजार पुरुषांनी महिला म्हणून अर्ज केल्यानं असे अर्ज बाद करण्यात आले. 

Ladki Bahin Yojana reasons why women Disqualify for scheme7/8

कमी वय

21 वर्षांहून कमी वय असणाऱ्या जवळपास 74 हजार महिलांनी या योदजनेसाठी अर्ज केल्याची बाब पडताळणीतून उघड झाली. योजनेच्या लाभार्थींपैकी 2 लाख महिला या 65 वर्षांहून अधिक वयाच्या असल्यानं त्यासुद्धा या योजनेस पात्र नाहीत. 

Ladki Bahin Yojana reasons why women Disqualify for scheme8/8

ई-केवायसी

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तब्बल 62 वाढीव 5 महिन्यांचा वेळ देऊनही त्यांनी ई-केवायसी केली नाही. या प्रक्रियेला मुदतवाढ देऊनही त्याची पूर्तता न झाल्यानं अपात्र महिलांचा आकडा वाढला.