'या' ऐतिहासिक ठिकाणी होणार 'दीप-वीर'चं लग्न

Nov 12, 2018, 14:56 PM IST
1/7

'या' ऐतिहासिक ठिकाणी होणार 'दीप-वीर'चं लग्न

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या विवाहसोहळ्यासाठी फक्त संपूर्ण कलाविश्वच नव्हे तर, चाहता वर्ग आणि सातासमुद्रापार असणारं एक नयनरम्य ठिकाणही सज्ज झालं आहे. ते ठिकाण अत्यंत महत्त्वाचं असण्याचं कारण म्हणजे दीपिका आणि रणवीर त्याच ठिकाणी एकमेकांना आयुष्यभरासाठी साथ देण्याची वचनं देणार आहेत. 

2/7

'या' ऐतिहासिक ठिकाणी होणार 'दीप-वीर'चं लग्न

इटलीतील त्या सुरेख ठिकाणाचं नाव आहे लेक कोमो. या ठिकाणी दीपिका आणि रणवीर Villa Del Balbianello या ठिकाणी त्यांचा विवाहसोहळा पार पडेल. सध्या येथे त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. 

3/7

'या' ऐतिहासिक ठिकाणी होणार 'दीप-वीर'चं लग्न

दीपिका आणि रणवीर सिंगचा विवाहसोहळा हा एखाद्या परिकथेतील सोहळ्याइतकाच दिमाखदार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली असून, आता गोष्टी शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. 

4/7

'या' ऐतिहासिक ठिकाणी होणार 'दीप-वीर'चं लग्न

सोशल मीडियावरही लेक कोमो आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसरातील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. 

5/7

'या' ऐतिहासिक ठिकाणी होणार 'दीप-वीर'चं लग्न

१८ व्या शतकात उभारण्यात आलेली ही वास्तू अनेक चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या आवडीची आहे. ज्यामुळे बऱ्याच चित्रपटांचंही या ठिकाणी चित्रीकरण झालं आहे. 

6/7

'या' ऐतिहासिक ठिकाणी होणार 'दीप-वीर'चं लग्न

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नासाठी हा व्हिला ८.५ लाख रुपयांना भाड्याने देण्यात येतो. ही किंमत २५ लाखांचाही आकडा गाठते. झालात ना तुम्हीही थक्क? 

7/7

'या' ऐतिहासिक ठिकाणी होणार 'दीप-वीर'चं लग्न

लेको, वेरेनना, मेनागजिओ, कोमो आणि बेलिगियो ही तलावाच्या सभोवतालची मुख्य शहरं आहेत. कर्डिनबाबिया, व्हिला कार्लोटा, ट्रेमेझो, लिनो ही गावं देखील त्या शेजारी वसली आहेत. खूप कमी लोकवस्ती असल्यामुळे येथील सगळ्या गोष्टी खूप महाग असल्याचं सांगितलं जातं.