close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लातूरकरांचा पाण्यासाठी संघर्ष

हिवाळा सरला आणि उन्हाळा आला. जिकडे तिकडे पाण्याची समस्या डोकेवर काढत आहे.

Apr 16, 2019, 10:35 AM IST

हिवाळा सरला आणि उन्हाळा आला. जिकडे तिकडे पाण्याची समस्या डोकेवर काढत आहे. उन्हाळा सुरू झाला आणि महाराष्ट्रतल्या लातूर जिल्ह्यातील गावकऱ्यांना पण्याचा प्रश्न भेडसावायला सुरूवात झाली आहे. जिलह्यातील शहरी भागात आठवड्यातून फक्त एक दिवस पाणी पुरवठा करण्यात येतो. पण ग्रामीण भागातील लोकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागते. अशा परिस्थित गावकरी शहराकडे जाणाऱ्या आणि लीक झालेल्या पाइपलाइनमधून आपल्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवतात. लातूरच्या आसपासच्या गावांमध्ये हे दृष्य कायम उन्हाळ्यात दिसते. 

गतवर्षी महाराष्ट्रतल्या लातूर जिल्ह्याने भयंकर दुष्काळाचा सामना केला होता. त्यामुळे हा भाग माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरला होता. परिस्थिती ऐवढी गंभीर होती, की चक्क पण्याने भरलेली ट्रेन दुष्काळी भागात पाठवण्यात आली होती. यंदाच्या वर्षी सुद्धा परिस्थितीत काहीही बदल झालेला दिसत नाही.

1/4

लीक झालेल्या पाइपलाइनमधून दोन गावांच्या पण्याचा प्रश्न मार्गी लागतो. दोन गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. 

2/4

रिक्षाच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी दिसतात. येथून प्रत्येक कुटुंब पाणी घेवून गावी जातात. महामार्ग असल्याने अपघात होण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणावर असते. तरी सुद्धा हे गावकरी आपला जीव धोक्यात घालून पण्यासाठी संघर्ष करताना दिसतात. 

3/4

पाण्याच्या कमतरते अभावी संपूर्ण कुटुंब एकत्र पाण्याच्या शोधात वनवन भटकत असतात. पाखरसांगवी गावात मिळणऱ्या पाण्यासाठी कुटुंबातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे पण्यासाठी तडजोड करताना दिसतात. पण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात भांडणे सुद्धा होतात. 

4/4

लातूर शहरातील पाखरसांगवी गावातील रहिवाशी या दिवसांमध्ये महामार्गाच्या कडेला उभे राहतात. या ठिकाणी शहराकडे जाणारी एक पाइपलाइन लीक झाली आहे. जेव्हा आठवड्यातून एक दिवस शहरातील लोकांना पाणी पुरवठा केला जातो, त्यावेळेस हे गावकरी फुटलेल्या पाइपलाइनमधून आपल्या पाण्याचा प्रश्न सोडवतात.