उन्हाळ्यात कार का पेटतात? प्रश्न छोटा पण नुकसान मोठं

उन्हाळ्यात कार पेटण्याच्या घटना का घडतात जाणून घेऊया. 

| May 05, 2024, 23:33 PM IST

Why Car Burn In Summer : उन्हाळ्यात जसं आपण शरीराची  काळजी घेतो तसे वाहनांची देखील काळजी घेतली पाहिजे. कारण, उन्हाळ्यात कार पेटण्याच्या घटांनामध्ये वाढ होते. जाणून घेऊया काय आहे उन्हाळ्यात कार पेटण्यामागचे कारण.  

1/7

उन्हाळ्यात कार पेटण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. मात्र, योग्य खबरदारी घेतल्यास या घटना टाळता येवू शकतात.

2/7

उन्हाळ्यात कार शक्यतो सावलीत पार्क करावी. कारची वेळोवेळी सर्व्हिंसिंग करावी. 

3/7

उन्हाळ्यात कार थंड ठेवण्यासाठी कारमधील व्हेंटिलेशन  तपासावे. कूलिंग चेक करावे.  

4/7

उन्हाळ्यात कार स्टार्ट करण्यापूर्णी कारचे इंजिन तसेच तापमान तपासून घ्या. 

5/7

उन्हाळ्यात कारच्या इंजिनाचे तापमान वाढते. यामुळे कार पेटण्याच्या घटना घडतात. 

6/7

कारमध्ये ज्वलनशील वस्तू जसे की लाइटर, आग पेटवणारे स्प्रे, इत्यादी वस्तू ठेवू नयेत.  उच्च तापमानामुळे या वस्तूंचा दाब वाढून त्या फुटून आग लागू शकते.   

7/7

उन्हाळ्यात कार पेटण्याची घटना केवळ नुकसानदायकच नाही तर जीवघेणी देखील ठरु शकते.