बॉलिवूडच्या ६ लाँग लास्टिंग जोड्या

बॉलिवूडचा व्हेलेंटाईन...

Feb 14, 2020, 12:21 PM IST

मुंबई : आज १४ फेब्रुवारी म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. अनेकांनी प्रेमाचे धडे बॉलिवूडच्या माध्यमातून गिरवले आहे. बॉलिवूडमध्ये अशा काही जोड्या आहेत ज्या कित्येक वर्षांपासून सोबत आहेत. आयुष्याच्या या प्रवासात त्यांनी कधीच एकमेकांची साथ सोडली नाही. बॉलिवूडमध्ये कोणाचं नाव कधी कोणासोबत जोडलं जाईल याची काहीचं कल्पना नसते. एवढचं काय तर ब्रेकअपच्या चर्चा देखील वाऱ्यासारख्या पसरत असतात. पण बॉलिवूडमध्ये अशा काही लॉन्ग लास्टिंग जोड्या आहेत ज्या आजही प्रेमाचा एक वेगळा संदेश देतात. 

1/6

दिलीप कुमार आणि सायरा बानो

दिलीप कुमार आणि सायरा बानो

दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या जोडीने अर्धशतक पूर्ण केलं आहे. या दोघांच्या ५२ वर्षांच्या साथीने इंडस्ट्रीमध्ये आदर्श निर्माण केला आहे. दिलीप कुमार यांनी चाहती असलेल्या सायरा बानो यांनी २२ व्या वर्षी ४४ वर्षांच्या दिलीप कुमारसह लग्न केलं होतं.

2/6

अमिताभ बच्चन - जया बच्चन

अमिताभ बच्चन - जया बच्चन

अमिताभ आणि जया बच्चन यांचं लग्न जवळपास ४५ वर्षांपूर्वी झालं. ही जोडी बॉलिवूडमधील एक पॉवर कपल म्हणून ओळखली जाते. जया आणि अमिताभ यांची ओळख ऋषीकेश मुखर्जी यांनी त्यांच्या 'गुड्डी' सेटवर करून दिली होती. त्यानंतर १९७३ साली अमिताभ आणि जया बच्चन यांनी एकत्र 'जंजीर' चित्रपटात काम केलं. याच चित्रपटादरम्यान दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

3/6

शाहरूख खान - गौरी खान

शाहरूख खान - गौरी खान

बॉलिवूडचा रोमान्सचा बादशाह किंग खान खऱ्या आयुष्यातही तितकाच रोमॅन्टिक आहे. गौरी आणि शाहरूखच्या लग्नाला जवळपास २८ वर्षे झाली असून अजूनही दोघांच्या प्रेमात कोणतीच कमी आली नाही. बॉलिवूडमध्ये शाहरूख-गौरी ही जोडी सगळ्याच कपल्ससाठी एक आदर्श उदाहरण आहे. शाहरूख आणि गौरीला आर्यन, सुहाना आणि अबराम ही तीन मुलं आहेत.

4/6

अक्षय कुमार - ट्विंकल खन्ना

अक्षय कुमार - ट्विंकल खन्ना

ट्विंकल खन्नाच्या 'मेला' चित्रपटानंतर लगेचच अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाशी लग्न केलं होतं. २००१ मध्ये हे दोघे लग्नबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाला १९ वर्षे पूर्ण झाली. त्यांना दोन मुलं आहेत. हे दोघेही कायम सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.

5/6

अजय देवगण - काजोल

अजय देवगण - काजोल

अजय आणि काजोल हे दोघेही अतिशय भिन्न स्वभावाचे आहेत. काजोल अतिशय फन लविंग व्यक्ती आहे तर अजय शांत स्वभावाचा आहे. या दोघांच्या लग्नाला जवळपास २१ वर्ष पूर्ण झाली आहेत. एकत्र राहण्यासाठी दोन लोक एकसारखेच असणं गरजेच नाही हेच या दोघांनी पटवून दिलं आहे.

6/6

ऋषी कपूर - नितू कपूर

ऋषी कपूर - नितू कपूर

३९ वर्ष एकमेकांसोबत राहणारे ऋषी कपूर आणि नितू कपूर यांनी सर्वांसमोर कपल गोल्स ठेवलं आहे. या दोघांनी हिंदी चित्रपटासाठी मोठं योगदान दिलं आहे. रिद्धिमा कपूर आणि रणबीर कपूर ही ऋषी आणि नितू यांची मुलं आहेत.