close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

असे असतील 'मुंबई मेट्रो लाईन-३'चे कोच

Aug 16, 2019, 18:37 PM IST
1/4

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी 'मुंबई मेट्रो लाईन-३'च्या कोचचं अनावरण करण्यात आलं. 'मुंबई मेट्रो लाईन-३' कुलाबा, वांद्रे आणि स्पीजला जोडणारी असेल. 

2/4

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (MMRCL)व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी 'मुंबई मेट्रो लाईन-३'च्या कोचचं अनावरण केलं. 'मुंबई मेट्रो लाईन-३'ला 'अॅक्वा लाईन' (AQUA LINE) असं नाव देण्यात येणार आहे.

3/4

विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'अलस्टोम इंडिया' आणि 'अलस्टोम' एसए या कंपन्या ८ कोच असणाऱ्या अशा ३१ ट्रेन बनवत आहेत. हे सर्व कोच आंध्र प्रदेशच्या श्री सिटीमध्ये 'मेक इन इंडिया' अंतर्गत तयार करण्यात येत आहे.

4/4

ही पूर्णपणे ड्रायव्हर लेस ट्रेन असणार आहे. संपूर्ण कोच वातानुकुलित असतील. याशिवाय कोचमध्ये एलसीडी स्क्रीन, डिजीटल मॅप इंडिकेटर, अग्निशमन यंत्र, स्मोक डिटेक्टर, आपातकालीन परिस्थितीत व्हॉईस कम्युनिकेटर असेल. तसंच शारीरिकरित्या दिव्यांगांसाठी डेडीकेटिड व्हीलचेयर भागही असणार आहे.