'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची 'केदारनाथ' वारी

काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडमध्ये असलेल्या चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील लाखो भाविक हे या यात्रेला जात देवाचं दर्शन घेताना दिसता. त्यात दरवर्षी सगळ्यात जास्त भाविक हे केदारनाथला जातात. अनेक सेलिब्रिटी देखील यावेळी केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी जातात. 

Diksha Patil | Jun 10, 2025, 04:26 PM IST
twitter
1/8

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता केदारनाथला पोहोचला आहे. त्याचे फोटो सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहेत. आता तुम्ही म्हणत असाल की आपण कोणत्या कलाकारांविषयी बोलतोय.  

twitter
2/8

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारा अभिनेता प्रथमेश शिवलकरनं केदारनाथचे दर्शन घेतले.   

twitter
3/8

प्रथमेशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. दरवर्षी लाखो भाविक केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी जातात. 

twitter
4/8

प्रथमेशनं हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत 'ऊँ नम: शिवाय' असं कॅप्शन दिलं आहे. तर त्यानं हे देखील सांगितलं की केदारनाथ हे त्याच्या बकेट लिस्टमध्ये होतं. 

twitter
5/8

त्याशिवाय त्यानं त्याच्या या संपूर्ण प्रवासातील काही फोटो शेअर केले आहेत. हा प्रवास करत असताना त्याला कशा प्रकारे डोंगर दिसले. 

twitter
6/8

तर हे फोटो शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं की 'प्रत्येक डोंगराची एक कथा असते.' 

twitter
7/8

त्याशिवाय प्रथमेशनं एक रील व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यानं सफरनाफा असं कॅप्शन दिलं आहे. 

twitter
8/8

दरम्यान, प्रथमेशनं शेअर केलेल्या या फोटोंवर सेलिब्रिटींची कमेंट करत 'ऊँ नम: शिवाय' किंवा 'हरहर महादेव' म्हटलं आहे.

twitter