close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सावळ्या रंगामुळे सुरुवातीला भेदभाव झाला- मलायका अरोरा

नेटकऱ्यांवर दुर्लक्ष करणारी मलायका   

Nov 07, 2019, 18:23 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत असते. परंतु कलाविश्वात आपलं स्थान प्रस्थपित करण्यासाठी तिला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं. तिच्या सावळ्या रंगामुळे तिच्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. 'मी जेव्हा कलाविश्वात पाय ठेवला तेव्हा सर्वत्र काळा, गोरा असा भेदभाव करण्यात येत होता. मला कायम काळ्या रंगातील श्रेणीत गणलं जायचं' असं वक्तव्य मलायकाने केलं आहे. 

1/5

आयटम साँगमुळे प्रसिद्धीझोतात

आयटम साँगमुळे प्रसिद्धीझोतात

मलायका 'छैय्या छैय्या', 'गुड नाल इश्क मिठा', 'काल धमाल', 'मुन्नी बदनाम हुई' यांसारख्या आयटम साँगमुळे प्रसिद्धीझोतात आली. 

2/5

नेहा धूपियाच्या शोमध्ये मलायका उपस्थित

नेहा धूपियाच्या शोमध्ये मलायका उपस्थित

मलायकाने नेहा धुपियाच्या 'नोफिल्टर्सनेहा' भाग ४ या शोमध्ये आपले मत मांडले. 

3/5

अर्जुन कपूरसोबत तिच्या नावाची चर्चा

अर्जुन कपूरसोबत तिच्या नावाची चर्चा

गेल्या अनेक महिन्यांपासून अर्जुन-मलायका एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरत आहेत. शिवाय त्यांनी देखील त्यांच्या नात्याचा स्वीकार केला आहे. 

4/5

नेटकऱ्यांवर दुर्लक्ष करणारी मलायका

नेटकऱ्यांवर दुर्लक्ष करणारी मलायका

अर्जुन आणि मलायकाच्या नात्यामध्ये असलेल्या वयाच्या अंतरामुळे ते दोघे कायम सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. परंतु याचा मलायकाला काडीमात्र फरक पडत नसल्याचं ती म्हणते.

5/5

मलायकाचं मत

मलायकाचं मत

'वैयक्तिक स्तरावर मला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. पण मला अशा लोकांचं वाईट वाटतं जे फक्त एकाच बाजुने विचार करतात' असं मत मलाकायने यावेळस मांडले.