शाहरुख खानचा मन्नत बंगला 225 वर्ष जुना; मंडीच्या राजानं त्याच्या राणीसाठी बांधला होता हा खास महल

शाहरुख खानचा मन्नत बंगला 225 वर्ष जुना आहे. एका राजाने आपल्या राणीसाठी हा बंगला बांधला होता. 

वनिता कांबळे | Mar 13, 2025, 00:13 AM IST

Mannat was Villa Vienna: सुपरस्टार शाहरुख खान याचा आलिशान 'मन्नत' बंगला हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला  शाहरुखचा मन्नत बंगला पाहण्याची इच्छा असते. शाहरुखचा हा 200 कोटींचा मन्नत बंगला साधासुधा नाही. हा बंगला 225 वर्ष आहे.  मंडीच्या राजानं त्याच्या राणीसाठी बांधलेला हा खास राजमहल आहे. 

1/7

24 वर्षांपूर्वी शाहरुखने 13 कोटींना मन्नत बंगला खरेदी केला होता. मात्र, हा बंगला 225 वर्ष जुना आहे. हा बंगला म्हणजे मंडीच्या राजानं त्याच्या राणीसाठी बांधलेला महल आहे. 

2/7

1997 साली येस बॉस चित्रपटाचे बँडस्टँड जवळ शुटींग सुरु असताना हा बंगला खरेदी करण्याचे स्वप्न शाहरुखने पाहिले. 2001 मध्ये शाहरुखने विला व्हिएन्ना हा बंगला खरेदी केला आणि त्याचे मन्नत असे ठेवले.   

3/7

राजा विजय सेन यांच्या निधनानंतर  मुंबईतील श्रीमंत पारसी व्यापारी मानेकजी बाटलीवाला यांनी हा बंगला  विकत घेतला. 

4/7

या बंगल्याचं नाव त्यांनी विला व्हिएन्ना ठेवलं होतं. त्या काळी हा बंगला मुंबईतील सर्वात सुंदर बंगल्यांपैकी एक होता.

5/7

मन्नत बंगल्याचा इतिहास दीडशे वर्ष जुना आहे.  मुंबईतील बँडस्टँडवर समुद्राच्या अगदी समोरच मंडीचे सोळावे महाराज राजा विजय सेन यांनी 1801 च्या आसपास त्यांच्या पत्नीसाठी एक आलिशान बंगला बांधला होता.  

6/7

 तब्बल 27,000 चौरस फुटांमध्ये पसरलेला हा सहा मजली मन्नत बंगला म्हणजे शाहरुखने सत्यात उतरवलेले स्वप्न आहे.   

7/7

 शाहरुफचा मन्नत बंगला 7 स्टार लक्झरी हॉटेलपेक्षा कमी नाही. पण मन्नत या इमारतीचे पूर्वीचे नाव होते- व्हिला व्हिएन्ना असे आहे.