समर- सुमीची पहिली मकर संक्रांत

Jan 14, 2020, 16:48 PM IST
1/8

समर- सुमीची पहिली मकर संक्रांत

सणावारांचे दिवस आले की त्याचे पडसाद मालिकांमध्येही उमटू लागतात. अगदी गणेशोत्सव, दिवाळीपासून थेट वटपैर्णिमेपर्यंत जवळपास सर्वच सण मालिकांच्या कथानकांमध्येही तितक्याच उत्साहात साजरा केले जातात. 

2/8

समर- सुमीची पहिली मकर संक्रांत

सध्या अनेक मराठी मालिकांमध्ये वळण आलं आहे ते म्हणजे मकर संक्रांतीच्या सणाचं. 

3/8

समर- सुमीची पहिली मकर संक्रांत

'मिसेस मुख्यमंत्री' ही मालिकासुद्धा याला अपवाद ठरलेली नाही. 

4/8

समर- सुमीची पहिली मकर संक्रांत

लाडकी सुमी आणि तिचा पती, 'पायलट' म्हणजेच समर हेसुद्धा सध्या त्यांच्या लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत साजरा करताना दिसत आहेत. 

5/8

कुटुंब, गावातील मंडळी, घरातील आणि कारखान्यातील कामात सहकार्य करणारी मंडळी या साऱ्यांच्याच उपस्थितीत सर्वांच्या लाडक्या जोडीने संक्रांतीचा सण साजरा केला. 

6/8

समर- सुमीची पहिली मकर संक्रांत

यावेळी सुमीने पारंपरिकपणा जपत हलव्याचे दागिने घातले होते. तर, समरही काळ्या रंगाच्या शर्टमध्ये या सणाचा आनंद घेताना दिसला. 

7/8

समर- सुमीची पहिली मकर संक्रांत

मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचं महत्त्वं असल्यामुळे मालिकेतील बऱ्याच कलाकारांनी आणि मुख्य भूमिकेतील समर- सुमीनेही याच रंगाच्या पेहरावाला पसंती दिली. 

8/8

समर- सुमीची पहिली मकर संक्रांत

'झी मराठी' वाहिनीच्या फेसबुक पेजवरुन या खास क्षणांची काही खास छायाचित्र पोस्ट करण्यात आली आहेत, जी पाहता खऱ्या अर्थाने मिसेस मुख्यमंत्री या मालिकेत मकर संक्रांतीचा उत्साह पाहायला मिळाला हे स्पष्ट झालं. (सर्व छायाचित्रे - झी मराठी / फेसबुक)