close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नवरात्रौत्सवात वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या 'रेकॉर्डतोड' रांगा

शारदीय नवरात्रोत्सवामध्ये वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. यंदाच्या २०१९च्या नवरात्रोत्सवात सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत जवळपास ३ लाख ५० हजार भाविकांनी वैष्णोदेवीच्या दरबारात हजेरी लावली असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या ५ वर्षांतील हा सर्वाधिक आकडा आहे.त्यामुळे भाविकांचा हा आकडा आधीचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.

Oct 08, 2019, 12:55 PM IST
1/5

गेल्या अनेक दिवसांपासून जम्मूमधील वातवरण तणावाचं होतं. पण नवरात्र उत्सव सुरु होताच, हा परिसर भाविकांनी फुलला आहे. देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तांच्या लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यांसह राज्यातील आर्थिक स्थितीतही सुधारणा होत असल्याचे चित्र आहे.

2/5

वैष्णोदेवी मंदिरातील हा अतिशय सुखद पैलू आहे. याचे श्रेय राज्याचे प्रशासन, पर्यटन विभाग, श्री माता वैष्णोदेवी बोर्डाला जातं. नवरात्रोत्सवानिमित्त देशभरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने राज्याकडे वळताना दिसत आहेत.

3/5

भाविकांची संख्या, त्यांचा उत्साह सतत वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्र उत्सवाआधी कटरा येथे येणाऱ्या भाविकांची संख्या दररोज जवळपास १२ ते १५ हजार इतकी होती. परंतु नवरात्रोत्सवात आता हा आकडा ३५ ते ४५ हजारांवर पोहचला असल्याचे सुत्रांकडून समजते आहे.

4/5

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी २९ सप्टेंबरला जवळपास ४८ हजार ९००, दुसऱ्या दिवशी ४० हजार, तिसऱ्या दिवशी ३९ हजार ९००, चौथ्या दिवशी ४१ हजार ५००, पाचव्या दिवशी ३६ हजार ८००, सहाव्या दिवशी ३८ हजार ४००, नवरात्राच्या सातव्या दिवशी ३८ हजार ५००, आठव्या माळेला ४१ हजार आणि नवमीला सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत जवळपास २५ हजार भाविक नोंदणी करुन वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी पोहचले होते. 

5/5

आजही भाविकांची गर्दी कायम आहे. गेल्या ५ वर्षांतील शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये येणाऱ्या भाविकांच्या संख्येहून, या वर्षी आलेल्या भाविकांची संख्या अनेक पटींनी अधिक आहे. भाविकांची वाढती संख्या राज्याच्या पर्यटन उद्योगासाठी सुखद संदेश असल्याचंच दिसतं आहे.