जुन्या 'शनाया'चा नवा बोल्ड लूक पाहिला का?

Jan 18, 2020, 18:26 PM IST
1/6

जुन्या 'शनाया'चा नवा बोल्ड लूक पाहिला का?

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे काही असे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले, ज्या चेहऱ्यांमधीलच एक नाव म्हणजे रसिका सुनील हिचं.  'ए गॅरी.....', असं म्हणत 'गुरूनाथ सुभेदार'च्या मागेपुढे घिरट्या घालणारी 'शनाया' साकारत रसिकाने जणू स्वत:चं अभिनय कौशल्य अतिशय सुरेख आणि तितक्याच प्रभावीपणे सर्वांपुढे ठेवलं. 

2/6

जुन्या 'शनाया'चा नवा बोल्ड लूक पाहिला का?

मालिकेचा टीआरपी एकिकडे वाढत असतानाच रसिकाने मात्र उच्च शिक्षण घेण्याच्या कारणास्तव मालिकेला रामराम ठोकला. 

3/6

जुन्या 'शनाया'चा नवा बोल्ड लूक पाहिला का?

मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत नसली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ती सातत्याने चाहत्यांच्या संपर्कात आहे. याच सोशल मीडियावर या जुन्या शनायाचं एक नवं आणि तितकंच लक्षवेधी रुप चर्चेत आलं आहे. खुद्द रसिकानेच इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या फोटोशूटमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. 

4/6

जुन्या 'शनाया'चा नवा बोल्ड लूक पाहिला का?

पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये रसिकाच्या अदा अनेकांचीच दाद मिळवून जात आहेत. 

5/6

जुन्या 'शनाया'चा नवा बोल्ड लूक पाहिला का?

रसिकाचं फक्त हेच फोटोशूट नव्हे, तर तिच्या इतरही पोस्ट पाहण्याजोग्या आहेत. 

6/6

जुन्या 'शनाया'चा नवा बोल्ड लूक पाहिला का?

सतत काहीतरी वेगळं आणि हटके करण्याच्या प्रयत्नांत असणारी शनाया, म्हणजेच रसिका आणि तिचे नवनवीन लूक्स हे फॅशन विश्वातील ट्रेंड फॉलो करणाऱ्या अनेकजणींसाठी जणू एक प्रकारचे #Style_Guide ठरत आहे, असं म्हणयला हरकत नाही. (सर्व छायाचित्रे- रसिका सुनील/ इन्स्टाग्राम)