महाराष्ट्रात इंजीनियरिंगचा भन्नाट नमुना! घराच्या बाल्कनीतून काढला उड्डाणपूल

नागपुरात घराच्या बाल्कनीतून उड्डाणपूल काढण्यात आला आहे. 

Vanita Kamble | Feb 13, 2026, 05:45 PM IST
twitter

Nagpur Flyover Passing Through House Balcony : चायनामध्ये  इंजिनीयरींगचे अजब गजब नमुने पहायला मिळतात. मात्र, आता महाराष्ट्रातील इंजिनीयरसमोर चायना पण फेल होत आहे. महाराष्ट्रात इंजिनीयरींगचा अजब चमत्कार पहायला मिळत आहेत. मुंबईजवळच्या मीरा-भाईंदरमधील 4 पदरीउड्डाणपूल अचानक मध्येच 2 पदरी झाला. तर, नागपुरात घराच्या बाल्कनीतून उड्डाणपूल काढण्यात आला आहे.

 

1/8

नागपूरमध्ये चक्क   घराच्या बाल्कनीतून उड्डाणपूल काढण्यात आला आहे. या उड्डाणपूलाचे बांधकाम पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. बाल्कनीत आले की उड्डाणपूलावरुन जाणाऱ्या वाहनांना अगदी सहज हात लागेल. 

twitter
2/8

मीरा-भाईंदरमध्ये इंजिनीयरींगचा अजब चमत्कार पहायला मिळाला. 4 पदरीउड्डाणपूल अचानक मध्येच 2 पदरी झाला. याचे फोटो पाहून सगळेच शॉक व्हाल झाले. यानंतर आता नागपूरचा हा  घराच्या बाल्कनीतून जाणारा उड्डाणपूल चर्चेत आला आहे. 

twitter
3/8

नागपूरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात उड्डाण पूल तयार केले जात आहे. मात्र उड्डाणपूल थेट लोकांच्या घराच्या खिडकी तर बाल्कनीला अगदी खेटून जाताना दिसत आहे.  

twitter
4/8

उड्डाणपुलामुळे लोकांना दिलासा मिळणार असला तरी उड्डाणपूल काहीं घरा लागून जात असल्यानं त्रास सहन करावा लागत आहे.

twitter
5/8

गोळीबार चौकजवळ हा उड्डाणपू परिसरात घराची खिडकी, शेड उड्डाणपूलावर आली आहे. याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.   

twitter
6/8

नागपूरातील दिघोरी ते इंदोराकडे जाणार उड्डाणपूल आहे. सुमारे 7.50 किलोमीटरचा हा पूल आहे. हा उड्डाणपूल एनएचएआयच्या देखरेखीखाली 998 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे.   

twitter
7/8

ज्या घराच्या बाल्कनीतून उड्डाणपूल गेला त्या घराचे मालक प्रवीण पात्रे आहेत. पात्रे म्हणाले की त्यांचे कुटुंब सहा पिढ्यांपासून या घरात राहत आहे आणि ही मालमत्ता सुमारे 150 वर्षे जुनी आहे. 25 वर्षांपूर्वी या घराचे नूतनीकरण करण्यात आले होते. 

twitter
8/8

हा उड्डाणपूल अशोक चौकाजवळील एका घराच्या बाल्कनीच्या एका भागातून जात आहे. स्थानिक लोक आठवे आश्चर्य म्हणत खिल्ली उडवत आहेत. या उड्डाणपूलाच्या बांधकामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  हा पूल एखाद्याच्या घरातून जात असताना  परवानगी देण्यापूर्वी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि नागपूर महानगरपालिकेने कोणतीही कारवाई का केली नाही?

twitter