close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मिस इंडिया सुमनच्या आयुष्यातील काही खास गोष्टी

राजस्थानी कन्या सुमन रावने यंदाच्या 'फेमिना मिस इंडिया २०१९' स्पर्धेतील किताबावर आपले नाव कोरले आहे.

Jun 16, 2019, 15:24 PM IST

मुंबई : राजस्थानी कन्या सुमन रावने यंदाच्या 'फेमिना मिस इंडिया २०१९' स्पर्धेतील किताबावर आपले नाव कोरले आहे. शनिवारी इंदुर येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिममध्ये विविध सेलिब्रिटींच्या उपस्थितीत या सौंदर्यस्पर्धेची अंतिम फेर पार पडली. आता पुढे २३ वर्षांची सुमन थायलंडमध्ये पार पडणाऱ्या 'मिस वर्ल्ड २०१९' या सौंदर्यवतींच्या स्पर्धेमध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. वयाच्या या टप्प्यावर मिळालेल्या या यशाचा आनंदही तिने व्यक्त केला.  'ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जिद्द आणि पूर्ण समर्पकतेने प्रयत्न करता तेव्हा तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी ही त्या लक्ष्याच्याच दिशेने काम करण्यास सुरुवात करते. त्या यशाच्या वाटेवर वाटचाल करण्यास सुरुवात  करते', असे ती म्हणाली.  

1/9

सुमनचा २३ नोव्हेंबर १९९६ जन्म झाला होता.

सुमनचा २३ नोव्हेंबर १९९६ जन्म झाला होता.

२३ वर्षांच्या सुमनचा जन्म २३ नोव्हेंबर १९९६ रोजी झाला. सोनम नेहमीच सोशल मीडियावर अग्रेसर असते. स्वत:चे फोटो ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

2/9

बास्केट बॉल खेळण्यात रस

बास्केट बॉल खेळण्यात रस

मीडिया रिपोर्टच्या माहितानुसार तिला बास्केट बॉल खेळण्यात फार रस आहे. स्पोर्ट्समध्ये देखील सुमन अव्वल स्थानी आहे.  

3/9

अनेक सामान्यांमध्ये सुमनचा सहभाग

अनेक सामान्यांमध्ये सुमनचा सहभाग

'मिस इंडिया'चा किताब जिंकण्यापूर्वी तिने अनेक बास्केट बॉलच्या सामन्यात सहभाग घेतला होता.

4/9

'नवी मुंबई २०१८'मध्ये पटकावला पहिली रनर अप होण्याचा मान

'नवी मुंबई २०१८'मध्ये पटकावला पहिली रनर अप होण्याचा मान

यंदाच्या वर्षी 'मिस इंडिया २०१९' किताबावर आपले नाव पटाकवणाऱ्या सुमन 'नवी मुंबई २०१८' मध्ये उल्लेखणीय कामगिरी बजावली होती.  

5/9

समुद्र किनारी साफसफाईमध्ये सुमनचे योगदान

समुद्र किनारी साफसफाईमध्ये सुमनचे योगदान

सुमनने मुंबईत अफरोज शाह यांच्या उपस्थितित समुद्र किनारा स्वच्छ करण्यासाठी आपले मोलाचे योगदान दिले होते.

6/9

सामाजिक जीवनात अग्रेसर

सामाजिक जीवनात अग्रेसर

सुमन तिच्या सामाजिक जीवनातही तितकीच अग्रेसर आहे. 'चाइल्ड हेल्प फाउंडेशन' संस्थेत तिने आतापर्यंत ८० हजार रूपयांपर्यंतची रक्कम चॉरिटीच्या माध्यमातून जमा केली आहे.  

7/9

'सीए'चे शिक्षण घेत आहे.

'सीए'चे शिक्षण घेत आहे.

सध्या सुमन तिचे 'सीए'चे शिक्षण घेत आहे.  

8/9

सोहळ्यात दिग्गज कलाकारांची उपस्थिती

सोहळ्यात दिग्गज कलाकारांची उपस्थिती

अतिशय दिमाखदार अशा या सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटी कतरिना कैफ, विकी कौशल, मौनी रॉय यांच्या परफॉर्मन्सने आणखी रंगत आणल्याचे पाहायला मिळाले.   

9/9

सुत्रसंचलनाची धुरा सांभाळली 'या' दिग्गजांनी

सुत्रसंचलनाची धुरा सांभाळली 'या' दिग्गजांनी

चित्रपट निर्माता- दिग्दर्शक करण जोहर आणि अभनेता मनिष पॉल यांनी या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती.