Monthly horoscope July 2021| या राशीच्या व्यक्तींना जुलै महिना अधिक फायद्याचा ठरणार

नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच जर आपल्याला कळलं की संकटं किंवा कोणत्या अडचणी येऊ शकतात तर त्याचा सामना करणं अधिक सोपं होतं. त्यासाठीच महिन्याच्या सुरुवातीला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 12 राशींसाठी हा महिना कसा असेल कोणत्या राशीला लाभ मिळणार आणि कोणत्या राशीचा शनी कडक होणार जाणून घ्या. 

Jun 30, 2021, 22:10 PM IST
1/12

मिथुन

मिथुन

या राशीच्या व्यक्तींना हा महिना चतुराईनं घालवावा लागणार आहे. आपल्या कार्यसिद्धीमध्ये आपण यशस्वी व्हाल. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणं योग्य आहे तो तुमच्यावर हावी झाला तर मोठं नुकसान होऊ शकतं. रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ शकते. कामाच्या ठिकाणी आपल्याला फायदा होण्याची शक्यता आहे. 

2/12

कर्क

कर्क

या राशीच्या व्यक्तींना प्रवासाचा योग आहे. या महिन्यात आपलं भरपूर मनोरंजन होणार आहे. आत्मचिंतन करण्याची संधी मिळाली आहे. कुटुंबातील परिस्थिती बेताची राहिल. मन उदास राहणार आहे. 

3/12

सिंह

सिंह

हा महिना कोर्ट कचेरीच्या कामात जाईल. व्यवसायात चांगली प्रगती होणार. कृषी क्षेत्रात सामन्य परिस्थिती असेल. आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक आणि मानसिक कुटुंबीय आणि नातेवाईकांचं सहकार्य मिळेल.

4/12

कन्या

कन्या

आर्थिकदृष्ट्या हा महिना खूप अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे वेळीच नियोजन करा. व्यवसायात अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. कृषी क्षेत्रात सामन्य स्वरुप राहिल. नोकरीमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तींसोबत नवीन कार्य, व्यवहार करणं टाळा

5/12

तूळ

तूळ

हा महिना आर्थिक प्रगती करणार असणार आहे. व्यवसायात चांगली प्रगती होईल. कृषी क्षेत्रात चढ-उतार येतील. नोकरी आणि अधिकार या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागेल. संयम राखणं महत्त्वाचं आहे. जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. सासरहून मदत मिळेल. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

6/12

वृश्चिक

वृश्चिक

जुलै महिना हा कौटुंबिक सुख देणारा असणार आहे. कृषी क्षेत्रात स्थिती मध्यम स्वरुपाची असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. आरोग्य सुधारेल. मित्रांसोबत भेटीगाठी होतील. मित्रांकडून संकटसमयी मदत मिळेल. 

7/12

धनु

धनु

हा महिना पती-पत्नीचं नातं आणि त्यांची प्रगती करणारा असणार आहे. व्यवसायात चढ-उतार येणार आहेत. कृषी क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. नोकरीत अडचणींचा सामना करावा लागेल. राजकारणात असलेल्यांना फायदा होईल.     

8/12

मकर

मकर

हा महिना आपल्यासाठी आर्थिक लाभ मिळवून देणार आहे. व्यापार-कृषी क्षेत्रात फायदा मिळेल. नोकरीमध्ये अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

9/12

मेष

मेष

या राशीच्या व्यक्तींना राजकारणात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रातही मोठा फायदा होईल. नोकरीमध्ये चांगला मार्ग मिळेल. मात्र अडचणी येतील त्यावर मात करत प्रगती हळूहळू होत राहील. मानसिक तणाव असेल. पत्नीची तब्येत अचानक बिघडण्याची शक्यता आहे. नातेवाईकांकडून अचानक भल्याच्या गोष्टी घडतील.   

10/12

वृषभ

वृषभ

गणेशजी यांच्या मते वृभष राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. घरात गुडन्यूज मिऴेल. कृषी क्षेत्रातही लाभ मिळेल. व्यापारात मात्र परिस्थिती ठिकठाक राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. मानसिक तणाव मात्र या महिन्यात आपल्याला असणार आहे.

11/12

कुंभ

कुंभ

नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळणार आहे. आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे वेळीच नियोजन करणं गरजेचं आहे. पत्नीची साथ मिळेल आणि समस्येचा सामना करण्याचं बळ येईल. 

12/12

मीन

मीन

हा महिना आपल्यासाठी परिवर्तन करणारा असणार आहे. नोकरीमध्ये प्रगती होणार आहे. कृषी क्षेत्रामध्ये मध्यम स्वरुपाची स्थिती असेल. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.