हे आहे जगातील सर्वात महागडं आईस्क्रीम; एका स्कूपच्या किंमतीत येईल आयफोन

बघूया या आईसक्रीममध्ये असं अजून काय काय आहे जे या आईसक्रीमला खास बनवतं.

Jul 24, 2021, 13:33 PM IST
1/5

तुम्ही कधी विचार केला आहे का की सोन्याने सजवलेलं आईसक्रीम कसं लागेल? आता तुम्ही म्हणाल असा विचार आम्ही का करू? सोन्याने सजवलेलं आईसक्रीम असतं का? तर या प्रश्नाचं उत्तर 'हो' असं आहे. दुबईमध्ये सोन्याने सजवलेलं आईसक्रीम उपलब्ध आहे.  दरम्यान या आईसक्रीमचा एक स्कूप इतका महाग आहे की तुम्ही एक आयफोन विकत घेऊ शकता. तर बघूया या आईसक्रीममध्ये असं अजून काय काय आहे जे या आईसक्रीमला खास बनवतं.

2/5

ट्रॅव्हल व्हॉल्गर शेनाझ ट्रेझरीने नुकतीच दुबईच्या प्रवासादरम्यान जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम चाखलं. यासोबतच तिने हे 'ब्लॅक डायमंड' आईस्क्रीम खाऊन इंस्टाग्रामवर व्हिडिओही पोस्ट केला. कॅप्शनमध्ये ती म्हणते, "असं काय आहे जे पैशाने विकत घेतले जाऊ शकत नाही? आईस्क्रीमला 60 हजार रुपये! मी दुबईत सोनं चाखत आहे. ही जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम आहे. हे चवदार आईस्क्रीम खाणं फारच मनोरंजक होतं. आणि हो, त्याने ते मला विनामूल्य दिलं होतं."

3/5

सोन्याचं स्रिपंकल करून सर्व केल्या जाणाऱ्या या आईसक्रीमच्या स्कूपची किंमत 60 हजार रूपये इतकी आहे. हे आईसक्रीम दुबईच्या स्कूपी कॅफेने लाँच केलं आहे. जे जगातील सर्वात महागडं आईसक्रीम आहे. स्कूपी कॅफेने सुरू केलेल्या या 'ब्लॅक डायमंड' आईस्क्रीममध्ये व्हॅनिला आईस्क्रीमवर 23 कॅरेट सोनं आणि इराणी केशर आणि ब्लॅक ट्रफल आहे.

4/5

या इतक्या महागड्या आईस्क्रीमला सर्व करण्याचा अंदाजही वेगळा आहे. या आईसक्रीमला ब्लॅक आणि गोल्डन रंगाच्या कपमधून ग्राहकांना दिलं जातं. 

5/5

दुबईतील हे स्कूपी कॅफे असे महागडे पदार्थ बनवत असतं. अलीकडेच त्यांनी 23 कॅरेट सोन्याने सजवलेल्या कॉफीचा फोटो शेअर केला होता.