निर्दयी आई : ५ वर्षांच्या चिमुकल्याने बिछाना ओला केला म्हणून गरम रॉडने....

Jul 04, 2021, 10:47 AM IST
1/5

बाळाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गरम सळी घुसवण्याचा प्रयत्न

बाळाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गरम सळी घुसवण्याचा प्रयत्न

डेली पोस्टमधील रिपोर्टनुसार, नायझेरियाच्या अडामावा प्रांतात धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या गोळ्याच्या खासगी भागात लोखंडाचा गरम रॉड घुसवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात महिला आरोपी विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. आरोपी आईचं नाव आयशा मोहम्मद असून तिचं वय 18 वर्षे आहे. ती या चिमुकल्याची सावत्र आई आहे.   

2/5

चिमुकल्याला मिळाली या चुकीची शिक्षा

चिमुकल्याला मिळाली या चुकीची शिक्षा

या 5 वर्षांच्या बाळाची चूक इतकीच होती की, त्याने झोपेत लघवी करून बिछाना ओला केला. चिमुकल्याची सावत्र आई या प्रसंगानंतर त्यांच्यावर खूप भडकली. ही आई आपल्या सावत्र बाळाला अजिबातच पसंत करत नाही. बाळाच्या सख्या आईचा वडिलांसोबत घटस्फोट झाला आहे. लहान मुलाची कस्टडी आता वडिलांकडे आहे. 

3/5

गंभीर पद्धतीने जखमी झालाय पाच वर्षांचा मुलगा

गंभीर पद्धतीने जखमी झालाय पाच वर्षांचा मुलगा

मुलाला एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यावर उपचार सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या सावत्र आईने खूप अत्याचार केले आहेत. लहान मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी गरम रॉड घालण्याचा प्रयत्न केला. तसेच गुप्तांगाजवळ अनेक चटके दिले आहेत. या दरम्यान मुलगा खूप गंभीर जखमी झाला आहे.   

4/5

असा झाला या घटनेचा खुलासा

असा झाला या घटनेचा खुलासा

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेला अटक झाली आहे. मुलाच्या रडण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांना संशय आला. पोलिसांना याबाबतची माहिती दिली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. 

5/5

प्रकरणाची कसून चौकशी

प्रकरणाची कसून चौकशी

'आई' या नात्याला काळीमा फासणारी ही घटना अतिशय धक्कादायक आहे.