मेगाप्लान! कोस्टल रोडला आता हवाई जोडणी; कसा आहे प्रकल्प, कोणत्या कंपन्या त्यासाठी स्पर्धेत?

Mumbai Coastal Road : मुंबईचं रुप आणखी बदलणार, कोस्टल रोडवर आणखी एक प्रकल्प... जाणून घ्या कशी आहे आखणी...   

Sayali Patil | Feb 04, 2026, 08:27 AM IST
twitter
1/9

मुंबई

Mumbai news helipad to be built on coastal road for air travel connectivity

Mumbai Coastal Road : काही वर्षांपूर्वीची मुंबई आणि सध्या पाहायला मिळते ती मुंबई यामध्ये प्रचंड फरक आहे. शहरातील रस्त्यांच्या रचना, त्यांचे आकार अगदीच काय तर शहरातील समुद्र किनाऱ्यांची रचनासुद्धा बदलली आहे. जिथं कधीकाळी समुद्र होता, तिथं आता शहरातील प्रवास वेगवान करणारे रस्ते बांधण्यात आले आहेत. 

twitter
2/9

सागरी किनारा मार्ग

Mumbai news helipad to be built on coastal road for air travel connectivity

सागरी किनारा मार्ग, सागरी सेतू यांमुळं मुंबई शहराच्या प्रवासातील एका नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता आणखी एका प्रकल्पाची जोडणी मुंबईत्या सागरी किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोडला दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

twitter
3/9

कोस्टल रोड

Mumbai news helipad to be built on coastal road for air travel connectivity

कोस्टल रोडमुळे मुंबईच्या मरिन ड्राइव्ह ते वांद्रे इथपर्यंतचा प्रवास वेगवान झाला. ज्यानंतर याच कोस्टल रोडच्या पुढच्या टप्प्याची बांधणीसुद्धा सुरू झाली आणि आता तिथं हवाई वाहतुकीची जोडणीसुद्धा देण्याता बेत असून, 'मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटी' देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

twitter
4/9

हेलिपॅड

Mumbai news helipad to be built on coastal road for air travel connectivity

कोस्टल रोडवर हेलिपॅड बांधण्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला रेमंइस आणि जिंदाल या कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून, अटी-शर्तीची पूर्तता आणि छाननीनंतर यासाठीच्या कंत्राटदार कंपनीची निवड करण्यात येईल.   

twitter
5/9

हेलिपॅडची उभारणी

Mumbai news helipad to be built on coastal road for air travel connectivity

सदर प्रकल्पाअंतर्हत हेलिपॅडची उभारणी, संचालन आणि देखभालही या कंत्राटदारामार्फत केली जाईल असं सांगण्यात येत आहे. ज्यामुळं येत्या काळात या कोस्टल रोडचं आणि पर्यायी मुंबईचंही रुप पालटणार असं म्हणणं गैर नाही.   

twitter
6/9

मुंबईचे दक्षिण टोक

Mumbai news helipad to be built on coastal road for air travel connectivity

मुंबईचे दक्षिण टोक असलेल्या नरिमन पॉइंटपासून उत्तर टोकाकडील दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्पाचं बांधकाम सध्या टप्प्याटप्प्याने सुरू आहे. 

twitter
7/9

हवाई वाहतुकीचीही जोडणी

Mumbai news helipad to be built on coastal road for air travel connectivity

कोस्टल रोडचा शामलदास गांधी मार्ग ते वरळी-वांद्रे सी लिंक पर्यंत 10.58 किलोमीटरचा पहिला टप्पा वाहतुकीस खुला करण्यात आला असून, आता कोस्टल रोडच्या वाहतुकीच्या प्रवासाला हवाई वाहतुकीचीही जोडणी देण्याचा मानस ठेवण्यात आला आहे.   

twitter
8/9

दिलासा

Mumbai news helipad to be built on coastal road for air travel connectivity

मुंबईत अनेक मोठी रुग्णालयं असून, अनेकदा रुग्णांची ने-आण करण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सचा वापर केला जातो. मात्र,  अशा स्थितीत सध्या विमानतळावर या अॅम्ब्युलन्स उतरवून रुग्णांना तिथून रुग्णालयात न्यावं लागतं, परिणामी दक्षिण मुंबईत हेलिपॅड झाल्यास रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असं प्रशासनानं सांगितलं आहे. 

twitter
9/9

सागरी हेलिपॅड

Mumbai news helipad to be built on coastal road for air travel connectivity

तेव्हा आता मुंबईत हे सागरी हेलिपॅड नेमकं कधी तयार होणार आणि त्याच्या उभारणीसाठीची जबाबदारी प्रशासन कोणत्या कंपनीवर सोपवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.   

twitter