मुंबईत झालेल्या तूफान पावसानं नागिरकांची तारांबळ उडवली असली, तरीही या पावसानं पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुंबई शहराला दिलासा मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही.
1/8मुंबई | मागील चार दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरामध्ये सुरू असणाऱ्या पावसानं यंत्रणांना धक्का देत नागरिकांच्या चिंतेत भर टाकली असली तरीही या पावसानं मुंबई शहराला दिलासासुद्धा मिळाला आहे. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
2/8मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील एकूण पाणीसाठा ४,१८,६४९ दशलक्ष लिटर झाला आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या २८.९२ टक्के इतका आहे. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
3/8मागील २४ तासांत जलाशय क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
4/8मोडक सागरमध्ये सर्वाधिक ३४५ मिमी, तर तानसा येथे ३२२ मिमी पावसाची नोंद झाली. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
5/8अप्पर वैतरणा येथे २१२ मिमी, मिडल वैतरणा येथे २३५ मिमी, भातसा येथे १७२ मिमी, विहार येथे १५१ मिमी आणि तुळशी येथे १६० मिमी पाऊस झाला. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
6/8जलाशयांपैकी विहार ९८.९८ टक्के आणि तुळशी ९५.८८ टक्के भरले असून हे दोन्ही तलाव पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यावर आहेत. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
7/8मोडक सागर ५२.२२ टक्के, तानसा ४२.८५ टक्के, मिडल वैतरणा २६.१२ टक्के, भातसा २४.५० टक्के आणि अप्पर वैतरणा १२.२५ टक्के भरला आहे. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
8/8भांडुप संकुलात गेल्या २४ तासांत १४० मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पाऊस १६०२ मिमी झाला आहे. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)