सावधान! ATM मध्ये तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक; पैसे काढायला मदत करतो म्हणाला अन्...

Published: Jun 02, 2026, 03:14 PM IST|Updated: Jun 02, 2026, 03:14 PM IST

ATM Fraud One Mistake Cost Thousands: एटीएएममध्ये गेल्यानंतर केलेल्या एका चुकीचा मोठा फटका नागपूरमधील व्यक्तीला बसला आहे. नेमकं घडलं काय ते पाहूयात...

atmfraud1/8

सावधान! ATM मध्ये तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक; पैसे काढायला मदत करतो म्हणाला अन्...

एटीएममधील फसवणुकीसंदर्भात तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, वाचलं असेल पण नागपूरमधील एका व्यक्तीला याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला असून त्याने केलेली एक छोटी चूक फार महागात पडली आहे. नेमकं घडलं काय ते जाणून घेऊयात सविस्तरपणे...

atmfraud2/8

अज्ञात व्यक्तीने मदतीच्या बहाण्याने फसवणूक केली

एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका सेवानिवृत्त शासकीय सेवकाची अज्ञात व्यक्तीने मदतीच्या बहाण्याने फसवणूक केली आहे. या व्यक्तीने केलेली छोटीशी चूक त्याला महागात पडली आहे. नक्की घडलं काय ते पाहूयात... 

atmfraud3/8

अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

या एटीएममधील फसवणुकीप्रकरणी नागपुरमधील बजाजनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

atmfraud4/8

व्यवहार पूर्ण करता आला नाही

तक्रारदार नरेंद्र सुखदेवे हे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना व्यवहार पूर्ण करता आला नाही. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने मदत करण्याच्या बहाण्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला. (फोटो एआयवरुन साभार)

 

atmfraud5/8

आरोपीने पैसे काढून न देता...

या दरम्यान त्याने एटीएमचा पिन क्रमांक जाणून घेतला. मात्र, पैसे काढून न देता आरोपीने चलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून दुसरे कार्ड त्यांच्या हाती दिले.

 

atmfraud6/8

घरी परतल्यानंतर लक्षात आलं

घरी परतल्यानंतर सुखदेवे यांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे लक्षात आले. दोन वेगवेगळ्या व्यवहारांअंतर्गत हे पैसे काढण्यात आले. 

 

atmfraud7/8

आधी 40 हजार काढले अन् नंतर...

तपासात 8 तारखेला खात्यातून 40 हजार रुपये आणि 9 तारखेला 8 हजार रुपये असे एकूण 48 हजार रुपये काढण्यात आल्याचे उघड झाले.

 

atmfraud8/8

तक्रार दाखल केली

या घटनेनंतर सुखदेवे यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्याची माहिती बजाज नगरचे पोलिस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी दिली. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य फ्री पिक आणि एआयवरुन साभार)