हार्दिक पांड्या- नताशाच्या लेकाच्या बर्थडे पार्टीचे Inside Photos

Jul 31, 2021, 20:39 PM IST
1/7

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची जोडीदार नताशा स्टॅन्कोविक यांच्या जोडीनं नुकताच त्यांच्या मुलाचा म्हणजेच अगस्त्यचा पहिला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिकला हजेरी लावता आलेली नव्हती. पण, तरीही त्यानं ऑनलाईन माध्यमातून लेकाला या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.   

2/7

नताशानं इन्स्टाग्रामवर मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले. कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती.   

3/7

 Boss Baby अशी या बर्थडे पार्टीची थीम होती. पार्टीचं ठिकाण थीमला अनुसरुन सजवण्यात आलं होतं.   

4/7

यासाठी पांढऱ्या आणि निळसर रंगाच्या फुग्यांचा सुरेख वापर करण्यात आला होता.   

5/7

बॉस बेबी केक, मॅकरुन्स, पेस्ट्री, स्नॅक्स अशा पदार्थांची या पार्टीमध्ये रेलचेल होती.   

6/7

मुलाच्या पहिल्या वाढदिवसात कोणतीही कमतरता राहणार नाही, याची नताशानं खात्री करत सर्व व्यवस्था केली होती.   

7/7

(सर्व छायाचित्र- नताशा स्टॅन्कोविक/ इन्स्टाग्राम)