देशभरात गुरुनानक जयंतीचा उत्साह शिगेला

Nov 12, 2019, 16:38 PM IST
1/6

देशभरात गुरुनानक जयंतीचा उत्साह शिगेला

देशभरात सध्या गुरुनानक जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शीख धर्मात अनन्यसाधारण महत्त्वं असणाऱ्या गुरुनानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त साऱ्या देशातील गुरुद्वारे आणि शीख वसाहतींमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)

2/6

देशभरात गुरुनानक जयंतीचा उत्साह शिगेला

शीखांचे पहिले धर्मगुरु गुरुनानक देवजी यांच्या उपदेशांनी कायमच समाजप्रबोधनाचं काम केलं. त्यांचे पवित्र शब्द आजही अनेकांना जीवनाच्या या प्रवासात मार्गदर्शक ठरत आहेत. याच मार्गदर्शनाप्रती आज अनेक ठिकाणी असणाऱ्या गुरुद्वारांमध्ये जाऊन प्रत्येकजण गुरुचरणी आपली कृतज्ञता व्यक्त करत आहे. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)

3/6

देशभरात गुरुनानक जयंतीचा उत्साह शिगेला

गुरुपूरब पर्वाच्या निमित्ताने दिल्ली, मुंबई, पंजाब या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)

4/6

देशभरात गुरुनानक जयंतीचा उत्साह शिगेला

गुरुद्वारा बांग्ला साहेब, गुरुद्वारा बेर साहेब, गुरुद्वारा पाटना साहेब अशा बिबिध ठिकाणी सकाळपासून भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)

5/6

देशभरात गुरुनानक जयंतीचा उत्साह शिगेला

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनीही गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने अमृतसरमधील गुरुद्वारा नानकेसर वर्का येथे जाऊन गुरुचरणी श्रद्धासुमनं अर्पण केली. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)

6/6

देशभरात गुरुनानक जयंतीचा उत्साह शिगेला

 'वाहे गुरु जी दा खालसा, वाहे गुरु जी दी फतेह', असं म्हणत एक वेगळीच उर्जा आज सर्वत्र पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)