Navi Mumbai Metro : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! विमानतळाभोवती दोन नव्या मेट्रो मार्गिकेचा सिडकोचा प्रस्ताव

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळाला मुंबईशी मेट्रोद्वारे जोडण्याचा नवा प्रस्ताव सिडकोने तयार केला आहे. त्यानंतर विमानतळाभोवती दोन नव्या मेट्रो मार्गिकेचा सिडकोचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला असून तो सरकारने मंजूर केला आहे.

Neha Choudhary | Apr 07, 2026, 04:40 PM IST
twitter
1/8

नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडण्यासाठी मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मेट्रो 1 (अ) आणि मेट्रो -2 अशा दोन नव्या मार्गिकांचा प्रस्ताव सिडकोने राज्य सरकारला पाठवला आहे.  एक मार्गिका मुंबई-नवी मुंबई मेट्रो-8 ला जोडली जाणार आहे. 

twitter
2/8

बेलापूर ते पेंढार दरम्यान मेट्रो मार्गिकेच काम सुरु आहे. पण बेलापूर-खारघर-पेंढार या मार्गावर 11 स्थानकांसह सुरु असलेल्या या प्रकल्पास प्रवाशांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी असला तरी तो भविष्यात वाढेल यावर काम सुरु आहे.

twitter
3/8

 मेट्रो -8 प्रकल्पामुळे नवी मुंबईतील वाशी ते बेलापूर या उपनगरांदरम्यान प्रथमच मेट्रो मार्गिकेचा विस्तार होणार आहे. याचा पुढचा टप्पा म्हणजे बेलापूर ते सागर संगम या नव्या मेट्रो मार्गिकेने जोडण्याचा प्रकल्प असणार आहे.

twitter
4/8

नवी मुंबई मेट्रो लान 1 चा विस्तार करत सीबीडी बेलापूर ते विमानतळाच्या पश्चिमेकडील बाजूस सागर संगम पर्यत नवी मार्गिका या प्रस्तावात तयार करण्यात आला आहे. 

twitter
5/8

नवी मुंबई सध्या पेंढार (तळोजा) ते बेलापूर अशी मेट्रो मार्गिकेचे काम सुरु आहे. ही मार्गिका सीबीडी रेल्वे स्थानक परिसरातून नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील सागर संगम स्थानकाच्या दिशेने नेली जाणार आहे. 

twitter
6/8

ही मार्गिका मुंबई-नवी मुंबई मेट्रो मार्गिका-8 चा एकमेकांशी जोडणार आहे. पुढे नवी मुंबई विमानतळाच्या दिशेने जाणार आहे. या मार्गिकेची लांबी तीन किलोमीटर इतकी राहणार आहे.

twitter
7/8

नवी मुंबई मेट्रो मार्गिका -2 हा सिडकोने आखलेला 17 किलोमीटर अंतराचा महत्वकांक्षी प्रकल्प पेंढार (तळोजा) पासून नवी मुंबई विमानतळाच्या पुर्वेकडील भागास 11 स्थानकांचा असेल.  

twitter
8/8

आसावरी, तळोजा सेक्टर 15, एमआयडीसी, नावडे रेल्वे स्थानक, कुदूपाडा गाव, रोडपाली बस स्थानक, कळंबोली, कामोठे, खांदेश्वर या उपनगरातून नवी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल चारच्या दिशेने ही मेट्रो मार्गिका असणार आहे.  

twitter