नवरात्रोत्सव : घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी अंबाबाईचं दर्शन

अंबाबाई देवीचं दर्शन

| Oct 17, 2020, 18:03 PM IST

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीची आजची पहिल्याच दिवशी 'महाशक्ती कुंडलीनिस्वरूपा' रुपात पूजा बांधण्यात आली आहे. दरवर्षी संपूर्ण देशभरातील भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी आणि नवरात्रोत्सव काळातील विविध रूपातील पूजा पाहण्यासाठी येत असतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश नाही. 

1/16

त्यामुळे भाविकांना ऑनलाईन माध्यमातूनच देवीचे हे देखणे रूप आपल्या डोळ्यात साठवावं लागणार आहे. 

2/16

विशेष म्हणजे यावर्षीच्या नवरात्रोत्सवात करवीर निवासिनीचे करवीर माहात्म्यातील स्तोत्रांमध्ये होणारे दर्शन ही संकल्पना राबवण्यात आली आहे.

3/16

 सर्व स्तोत्रांमधून करवीर निवासिनीचे व्यापक आणि आदिशक्तीचे स्वरूपच वारंवार प्रकट होताना दिसते. 

4/16

कधी ती शिवाचे संहारकार्य करताना दिसते तर कधी ब्रह्माचे निर्माणकार्यही करताना दिसते तर कधी विष्णूचे पालनकार्यही तिच करते. 

5/16

ब्रह्मा, विष्णू शिवाची ती जननीही आहे आणि आत्मशक्तीही... अशा महाशक्तीची करवीर महात्म्य त्यातील निवडक स्तोत्रे, मूळ संस्कृत संहिता आणि त्यांची मराठी आवृत्ती यास्वरूपातील पूजेच्या निमित्ताने भक्तांच्या समोर पोहोचणार आहे. 

6/16

आजची ही पूजा माधव मुनिश्वर आणि मकरंद मुनिश्वर यांनी बांधली..

7/16

8/16

9/16

10/16

11/16

12/16

13/16

14/16

15/16

16/16