close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नवाब-पूजाच्या प्रेमाची 'विरासत'

'विरासत' चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री पूजा बात्रा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Jun 19, 2019, 14:40 PM IST

मुंबई  : 'विरासत' चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री पूजा बात्रा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कलाविश्वापासून फार काळ दूर असलेली पूजा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे.  सोशल मीडियावर पूजाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. एक काळ अभिनेता अक्षय कुमारच्या प्रेमात असलेली ४२ वर्षांची पूजा पुन्हा प्रेमात अडकली आहे. 'टायगर जिंदा हैं' स्टारर अभिनेता नवाब शाहच्या नावाला पुजाचे नाव जोडण्यात येत आहे. 

1/4

नवाब शाहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्याने सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो देखील शेअर केले आहेत. 

2/4

पूजा आणि नवाब एकमेकांना डेट करत आहेत. पूजा बत्राने 'नायक', 'हसीना मान जायेंगी', 'जोडी नं १', 'कही प्यार ना हो जाएँ' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.   

3/4

पूजाला अभिनय क्षेत्रात फारसे यश मिळाले नाही. पूजाने एनआरआय डॉक्टर सोबत लग्न केल्यानंतर चित्रपटसृष्टीला बाय-बाय केले होते. २००९ मध्ये त्यांच्या नात्याला उतरती कळा लागली. 

4/4

नवाब-पूजाच्या प्रेमाची 'विरासत'

नवाब-पूजाच्या प्रेमाची 'विरासत'

बॉलिवूडची ग्लॅमरस अदाकारा पूजा बत्रा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव असते.