वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळे यांना मिळालं खास गिफ्ट, भावुक पोस्ट करत म्हणाल्या...

Jul 01, 2021, 17:43 PM IST
1/5

राष्ट्रवादीच्या धडाडीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा केला.   

2/5

सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षातील कार्यकर्त्यांपासून अगदी विरोधी पक्षांकडूनही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पण, या दिवसाचं सेलिब्रेशन अधिक खास तेव्हा ठरलं जेव्हा सुप्रिया सुळे यांनी हे क्षण त्यांच्या कुटुंबासमवेत व्यतीत केले.   

3/5

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या खास क्षणांचे फोटो सर्वांच्याच भेटीला आणले.   

4/5

पती, मुलं आणि आई- वडिलांचा आशीर्वाद घेत, केक कापत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी एक खास भेट त्यांना भावूक करुन गेली.   

5/5

सुप्रिया सुळे यांच्या लेकीनं नोकरीला लागल्यानंतर त्यांच्यासाठी वाढदिवसानिमित्त खास केक आणला. लेकिची ही कृती आपल्याला सुखावह अनुभव देऊन गेली, असं त्यांनी भावना व्यक्त करत त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून लिहिलं. मुलांचं यश आई- वडिलांना आपल्या यशापेक्षा नेहमीच मोठं वाटतं अशा शब्दांत त्यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली. (सर्व छायाचित्र- सुप्रिया सुळे/ इन्स्टाग्राम)