Apple Peel Benefits: सालटं काढून सफरचंद कधीही खाऊ नका, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान... जाणून घ्या

Do Not Remove Apple Peel: असं म्हटलं जातं की, दररोज एक सफरचंद खाल्याने डॉक्टर कडे जाण्याची वेळ येत नाही. त्याचं कारण म्हणजे, सफरचंदमध्ये असे गुणधर्म असतात जेणेकरुन अनेक आजारांवर सफरचंद गुणकारी ठरतो. असं असताना देखील अनेकजण, इतक्या महत्वाच्या फळाचं सेवन करताना त्याच्या सालटी काढतात. तुम्हालासुद्धा सालटं काढून सफरचंद खाण्याची सवय असेल तर ते आत्ताच बंद करा. जाणून घ्या, याचं कारण... 

Sep 20, 2022, 16:51 PM IST
1/5

वजन कमी करण्यासाठी सर्वात उपयुक्त फूड्समध्ये (Weight Loss Food) सफरचंदची गणना केली जाते. सफरचंदच्या सालट्यांमध्ये युरसोलिक एसिड (Ursolic acid) मोठ्या प्रमाणात आढळतं. यामुळे पोटावरची चरबी (Belly Fat) कमी करण्यासाठी मदत होते परिणामी लवकर वजन कमी होतं.

2/5

ज्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो अशा लोकांनी सालट्यासहीत सफरचंदचं सेवन केलं पाहिजे. याचं कारण म्हणजे, सफरचंदच्या सालट्यामध्ये क्यूरसेटिन असते जे ब्रीदिंग प्रॉब्लेम्सला दूर करण्यास मदत करते.

3/5

एका सफरचंदमध्ये जवळपास 8.5 मिलीग्रॅम विटामिन सी आणि 98 इंटरनॅशनल यूनिट एवढं विटामिन ए चं प्रमाण असतं. सफरचंदचं सालटं काढल्यानंतर एका सफरचंदमध्ये जवळपास 6.8 मिलीग्रॅम आणि 60 इंटरनॅशनल यूनिट इतकं प्रमाण शिल्लक राहतं. यामुळे डॉक्टर्सकडून नेहमी सालट्यासहीत सफरचंद खाण्याची सल्ला दिला जातो.

4/5

एका मध्यम आकाराच्या सफरचंदमध्ये जवळपास 4.5 ग्रॅम फायबर असतं पण जर सफरचंदमधून सालटं काढल्यानंतर त्यामध्ये केवळ 2 ग्रॅम फायबर शिल्लक राहतं.

5/5

अमेरिकेच्या कॉर्नेल युनिवर्सिटीच्या (Cornell University) एका रिसर्चमध्ये असं सिद्ध झालंय की, सफरचंदला सालट्यासहीत खाल्याने पोट, लिव्हर आणि ब्रेस्ट कॅन्सर सेल्सची निर्मिती होण्याचा धोका कमी होतो. (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)