स्वस्तात मस्त, कमी खर्चिक Bullet 350 तुमच्या भेटीला

Aug 12, 2019, 11:06 AM IST
1/5

स्वस्तात मस्त, कमी खर्चिक Bullet 350 तुमच्या भेटीला

बाईक प्रेमींसाठी जिवापाड महत्त्वाचं असणारं एक नाव किंबहुना एक बाईक, म्हणजे Royal Enfield. अनेकांसाठी 'शान' असणाऱ्या याच बाईकच्या निर्मात्यांकडून Bullet 350 चं नवं मॉडेल बाजारात आणण्यात आलं आहे. ज्याची किंमत जुन्या मॉडेलच्या तुलनेत कमी आहे. Bullet 350 च्या नव्या मॉडेलची किंमत ही १.१२ लाख रुपयांपासून सुरू होत आहे. तर Bullet 350 ES ची सुरुवात १.२७ लाख रुपयांपासून सुरू होत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार नव्या मॉडेलमध्ये आकर्षक रंगांचे पर्यायही उपलब्ध आहेत. हे नवं मॉडेल स्टँडर्ड मॉडेलहून ११ हजार रुपये आणि ES मॉडेलहून २२ हदार रुपयांनी स्वस्त आहे. ज्याचं नाव Bullet 350 RE असं ठेवण्यात आलं आहे. (छाया सौजन्य- ट्विटर) 

2/5

स्वस्तात मस्त, कमी खर्चिक Bullet 350 तुमच्या भेटीला

सिंगल सिलिंडर इंजिन  दोन्ही मॉडेलमध्ये  ३४६ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन आहेत. ज्यातून 20 PS, 5250 rpm पॉवर जनरेट केली जाते. ज्यामध्ये 4,000 rpm वर 28 Nm पर्यंतचं पीक टॉर्क जनरेट केलं जातं.  (छाया सौजन्य- ट्विटर) 

3/5

स्वस्तात मस्त, कमी खर्चिक Bullet 350 तुमच्या भेटीला

डिस्क ब्रेक  ही बुलेट 280 एमएम डिस्क ब्रेक, सिंगल चॅनल एबीएस आणि 153 एमएम ब्रेक आहेत. (छाया सौजन्य- ट्विटर) 

4/5

स्वस्तात मस्त, कमी खर्चिक Bullet 350 तुमच्या भेटीला

इंजिन ऑईल  Royal Enfield  च्या ग्राहकांना आता दर सहा महिन्यांनी किंवा ५ हजार किलोमीटर अंतर चालल्यानंतर इंजिन ऑईल बदलण्याची गरज भासणार नाही. (छाया सौजन्य- ट्विटर) 

5/5

स्वस्तात मस्त, कमी खर्चिक Bullet 350 तुमच्या भेटीला

देखभाल करण्याचा कमी खर्च  यापुढे इंजिन ऑईल बदलण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच जवळपास १० हजार किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर इंजिन ऑईल बदलावं लागणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार जवळपास तीन वर्षांमध्ये या बाईकची देखभाल करण्यासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये येत्या तीन वर्षांत ४० टक्क्यांनी कपात होणार आहे. (छाया सौजन्य- ट्विटर)