देशातील 'या' शहरात लॉकडाउनची घोषणा; शाळा, कॉलेज बंद; मशिदीतील शुक्रवारचं नमाज पठणही रद्द

केरळमध्ये निपाहचे 6 रुग्ण आढळले असून, हा संसर्ग पसरु नये यासाठी राज्य सरकारने पूर्वकाळजी घेत काही निर्णय घेतले आहेत. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने अलर्ट जारी केली असून केरळच्या कोझिकोड येथे लॉकडाउन लावला आहे.

Sep 15, 2023, 12:41 PM IST
1/10

केरळमध्ये निपाहचे 6 रुग्ण आढळले असून, हा संसर्ग पसरु नये यासाठी राज्य सरकारने पूर्वकाळजी घेत काही निर्णय घेतले आहेत.   

2/10

वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने अलर्ट जारी केली असून केरळच्या कोझिकोड येथे लॉकडाउन लावला आहे.  

3/10

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) संसर्गाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारच्या विनंतीनुसार, अँटीबॉडी डिलिव्हर केले आहेत.   

4/10

तसंच राज्याला नमुने तपासणे करता यावं यासाठी मोबाईल प्रयोगशाळा देखील पाठविण्यात आली आहे.   

5/10

लोकांनी निपाह प्रभावित भागांमध्ये गरज नसल्यास प्रवास करु नये असा सल्ला दिला आहे. आरोग्य विभागाने केरळच्या सीमा भागातील जिल्ह्यांना म्हणजेच कोडागु, दक्षिण कन्नड, चामराजनगर आणि मैसूरमध्ये अलर्ट जारी केला आहे. कर्नाटकमधून केरळमध्ये प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवरील तपासणी वाढवण्यात आली आहे.  

6/10

कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी 16 सप्टेंबर रोजी अंगणवाड्या, मदरसे, महाविद्यालयं, शिक्षण केंद्रांसह सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान याआधीच 14 सप्टेंबर आणि 15 सप्टेंबर या दोन सुट्ट्या आहेत.   

7/10

मात्र विद्यापीठांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  

8/10

कुट्टियाडी जुमा मशिदीत शुक्रवारची प्रार्थना नाही

कुट्टियाडी जुमा मशिदीत शुक्रवारची प्रार्थना नाही

कुट्टियाडी जुमा मस्जिद महल्लू कमिटीचे सचिव झुबेर पी म्हणाले आहेत की, "आमच्या भागात निपाह व्हायरसच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवरजिल्हाधिकार्‍यांनी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी आम्हाला मशिदीत गर्दी न करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत मशीद बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आज मशिदीत शुक्रवारची नमाज अदा केली जाणार नाही".   

9/10

निपाह व्हायरसची लक्षणं काय?

निपाह व्हायरसची लक्षणं काय?

जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर त्याला खूप ताप, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, घसा खवखवणे, अॅटिपिकल न्यूमोनिया यांसारखी लक्षणं दिसतात. परिस्थिती अधिक गंभीर असल्यास, व्यक्ती 24 ते 48 तासांच्या आत एन्सेफलायटीसची शिकार होऊ शकते आणि कोमात जाऊ शकते. निपाह व्हायरसची लक्षणं 5 ते 14 दिवसात दिसू शकतात. परंतु काही प्रकरणांमध्ये हा काळ 45 दिवसांपर्यंत वाढू शकतो. इतक्या काळात आपण इतक्या लोकांना भेटती की, किती जणांना संक्रमित केलं आहे हे समजणारही नाही. काही प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीला अजिबात लक्षणं दिसत नाही असंही होऊ शकतं.   

10/10

नेमकी काय काळजी घ्यावी?

नेमकी काय काळजी घ्यावी?

जर तुम्हालाही आपल्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याची शंका असेल तर आरटी-पीसीआर चाचणी करुन घ्या. याशिवाय पीसीआर, सीरम न्यूट्रिलाइजेशन आणि एलाइजा टेस्टच्या माध्यमातून व्हायरसची माहिती घेऊ शकता.