close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

... अशी होती नीतू- ऋषी यांची पहिली 'वाईट' भेट

 बॉलिवूडमधील रिल आणि रियल जीवनात अत्यंत यशस्वी ठरलेली जोडी म्हणजे आभिनेता ऋषी कपूर आणि नीतू कपूर (सिंग) यांची.

Jul 11, 2019, 14:13 PM IST

मुंबई : बॉलिवूडमध्ये नात्यांचं तुटणं तर कधी कोणाचे कोणासह सूत जुळणं अशा अनेक चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असतात. पण, त्यातही काही जोड्या मात्र अविरतपणे सहजीवनाचा आदर्श देत असतात. बॉलिवूडमधील रिल आणि रियल जीवनात अत्यंत यशस्वी ठरलेली जोडी म्हणजे आभिनेता ऋषी कपूर आणि नीतू कपूर (सिंग) यांची. तब्बल ४० वर्षांच्या संसारात हे दोघे फार आनंदात आहेत. या दोघांच्या नात्याची सुरूवात कशी, कुठे आणि कशाप्रकारे झाली. यासंबंधीत मोठा खुलासा चक्क नीतू कपूर यांनी केला आहे.

1/5

... अशी होती नीतू- ऋषी यांची पहिली 'वाईट' भेट

... अशी होती नीतू- ऋषी यांची पहिली 'वाईट' भेट

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नीतू यांनी त्याच्या प्रेम कथेचा गोड खुलासा केला आहे. ऋषी कपूर आणि त्यांची पहिली भेट फार वाईट असल्याचे सांगत त्या म्हाणाल्या की, 'ऋषी प्रत्येकाची थट्टा मस्करी करायचे. मी जेव्हा तयार होऊन सेटवर यायचे तेव्हा ते मला सुद्धा चिडवायचे. त्यांच्या अशा वागण्याचा मला फार त्रास व्हायचा'

2/5

... अशी होती नीतू- ऋषी यांची पहिली 'वाईट' भेट

... अशी होती नीतू- ऋषी यांची पहिली 'वाईट' भेट

नीतू यांना ऋषी कपूर फार वाईट स्वभावाचे वाटतं होते. त्यांच्या अशा वर्तवणुकीचा नीतू यांना फार राग यायचा. एक काळ गाजवलेल्या या जोडप्याची केमिस्ट्री चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली. त्यानंतर दोघांना अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्यासाठी ऑफर्स देखील येवू लागल्या. 

3/5

... अशी होती नीतू- ऋषी यांची पहिली 'वाईट' भेट

... अशी होती नीतू- ऋषी यांची पहिली 'वाईट' भेट

'बॉबी' चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतर अभिनेत्री डिंपल कपाडियाने लग्न केले. त्यानंतर ऋषी कपूर सोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी कोणतीच अभिनेत्री नव्हती कारण त्या सगळ्या त्यांच्या पेक्षा फार मोठ्या होत्या. त्यामुळे नीतू वयाने लहान असल्यामुळे ऋषी कपूर यांच्या सोबतचे सर्व चित्रपट नीतू यांच्या पदरी पडले.  

4/5

कशी घातली प्रेमाची मागणी

कशी घातली प्रेमाची मागणी

त्यानंतर दोघांचे एका पाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होत गेले. प्रेमाची मागणी कशाप्रकारे घातली? हा प्रश्न विचारल्यावर त्या म्हाणाल्या की ,'अनेक चित्रपट यशाच्या शिखरावर पोहोचत असताना ते म्हणाले, फक्त चित्रपट करत राहशील तर लग्न कधी करशील?' त्यानंतर त्या म्हणाल्या की, 'लग्न करण्यासाठी चांगला मुलगा तर हवा...'

5/5

कशी घातली प्रेमाची मागणी

कशी घातली प्रेमाची मागणी

नीतूच्या या उत्तरावर क्षणाचाही विलंब न करता ऋषी कपूर यांनी 'मी आहे ना...' असे उत्तर दिले. अशा प्रकारे नीतूच्या रागाचे रूपांतर प्रेमात झाले आणि रिल लाईफमध्ये अग्रेसर ही जोडी रीअल लाईफमध्ये सुद्धा यशस्वी ठरली