फुकटात IPL मॅच पाहण्याचे दिवस संपले? IPL 2025 आधी अंबानींचा मोठा निर्णय; भरावे लागणार एवढे पैसे
IPL 2025 Jio Hotstar : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात प्रसिद्ध टी 20 लीग पैकी एक आहे. लवकरच आयपीएलच्या 18 व्या सीजनला सुरुवात होणार असून यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. दरवर्षी अनेक चाहते स्टेडियमवर जाऊन आयपीएलचे सामने पाहतात तर याहूनही अधिक चाहते मोबाईल तसेच डिजीटल गॅजेट्स आणि टीव्हीवर हे सामने पाहण्याचा आनंद घेतात. परंतु आता अंबानींनी आयपीएल 2025 पूर्वी मोठा निर्णय घेऊन चाहत्यांना धक्का दिला आहे.
Pooja Pawar
| Feb 14, 2025, 14:07 PM IST
1/7

2023 मध्ये अंबानींच्या जिओ सिनेमाने आयपीएलच्या डिजिटल स्ट्रीमिंगचे राईट्स विकत घेतले. त्यामाध्यमातून मोबाईलवर आयपीएल सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत दाखवण्यात येत होते. मागील दोन वर्ष जिओ सिनेमावर क्रिकेट चाहते सबस्क्रिप्शन न घेता मोबाईलवर फुकटात आयपीएल सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकत होते. मात्र आता आयपीएल 2025 मध्ये तसे होणार नाही आणि चाहत्यांना यासाठी पैसे मोजावे लागतील.
2/7

3/7

4/7

5/7

जिओ सिनेमाने 2023 पासून पुढील पाच वर्षांसाठी आयपीएलचे डिजिटल राईट्स $3 billion रुपयांना विकत घेतले होते. 2023 पासून जिओ सिनेमाने मोबाईलवर फुकटात लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु केले. मात्र 2025 मध्ये चाहत्यांना संपूर्ण सामना पाहण्यासाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार सबस्क्रिप्शन विकत घ्यावे लागेल. परंतु रिलायन्सने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
6/7
