हिमाचल प्रदेशवर बर्फाची चादर....

Nov 15, 2018, 10:39 AM IST
1/7

हिमाचल प्रदेशवर बर्फाची चादर....

थंडीचा गोठवणारा काळ आता चांगलाच जोर धरताना दिसत अशून उत्तर भारतात त्याचे थेट परिणाम पाहायला मिळत आहेत. मनाली, शिमला यांसारख्या ठिकाणी बुधवारी बर्फवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच या परिसरात पावसाचा शिडकावाही झाला. 

2/7

हिमाचल प्रदेशवर बर्फाची चादर....

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस सदर परिसरात अशाच प्रकारचं वातावरण वातावरण पाहायला मिळणार असून पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. 

3/7

हिमाचल प्रदेशवर बर्फाची चादर....

किलॉंग परिसरातील तापमान १.९ अंश सेल्शिअसवर पोहोचलं असून कल्पा येथे पारा १.२ अंश सेल्शिअसवर पोहोचला आहे. शिमला, धरमशाला आणि डलहौसी परिसरावरही तापमानात घट झाल्याचं आढळलं आहे. 

4/7

हिमाचल प्रदेशवर बर्फाची चादर....

शिमल्यातील नारकांडा परिसरात बर्फाची चादर पसरली असून, येथील स्थानिक वातावरणातील या बदलाचं स्वागत करत आहेत. 

5/7

हिमाचल प्रदेशवर बर्फाची चादर....

किन्नौर जिल्ह्यातील सांगला खोऱ्यातील ही दृश्य. जणू सर्वत्र सफेद सोन्याची उधळण झाल्याचीच अनुभूती होत आहे. 

6/7

हिमाचल प्रदेशवर बर्फाची चादर....

पर्यटकांचीही या परिसरामध्ये गर्दी होण्यास सुरुवात झाली असून, सर्वत्रच एक उत्साह पाहायला मिळत आहे. 

7/7

हिमाचल प्रदेशवर बर्फाची चादर....

थंडीच्या दिवसांमध्ये निसर्गाची श्वेत छटा पाहण्याचा सुखद अनुभव घेण्यासाठी कित्येकजण उत्तर भारतातील हिमाचल, काश्मीर आणि त्यानजीकच्या परिसराला भेट देण्याचे बेत आखत आहेत.