अल्लू अर्जुनच नाही तर 'या' बॉलिवूड स्टार्सनी सुद्धा खाल्लीये जेलची हवा

पुष्पा 2' चित्रपटामुळे संपूर्ण देशभरात चर्चेत असलेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली आहे. अल्लू अर्जूनला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकल्या आहेत. तसेच कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावली. पण जेलमध्ये गेलेला अल्लू हा पहिला कलाकार नाही. तेव्हा यापूर्वी बॉलिवूडच्या किती कलाकारांना जेलची हवा खावी लागली याबद्दल जाणून घेऊयात. 

| Dec 13, 2024, 18:24 PM IST
1/7

सलमान खान :

1998 मध्ये 'हम साथ साथ हैं' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोन काळवीट मारल्याप्रकरणी सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. ऑक्टोबर 1998 ते ऑगस्ट 2007 पर्यंत, काळवीट हत्येप्रकरणी अभिनेत्याने 18 दिवस तुरुंगात घालवले. खानला 2002 च्या हिट अँड रन प्रकरणात दोन वर्षांची शिक्षाही झाली होती, मात्र त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला.   

2/7

संजय दत्त :

संजय दत्त हा सर्वाधिक काळ जेलमध्ये राहिलेला बॉलिवूड कलाकार आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात दोषी आढळलेल्या संजय दत्तला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. परंतु 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा पाच वर्षांपर्यंत कमी केली होती. परंतु नंतर संजय दत्तच  जेलमधील चांगली वागणूक पाहून त्याची शिक्षा 8 महिन्यांनी कमी करण्यात आली. संजय दत्तने तब्बल 42 महिने तुरुंगात शिक्षा भोगली.

3/7

रिया चक्रवर्ती :

अभिनेत्री आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला अंमली पदार्थ खरेदीच्या आरोपाखाली 8 सप्टेंबर 2020 रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने अटक केली होती. सुमारे महिनाभर रिया तुरुंगात होती आणि मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी भायखळा कारागृहातून तिची सुटका करण्यात आली.   

4/7

शायनी आहुजा :

अभिनेता शायनी आहुजा याला त्याच्या घरी काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी विशेष जलदगती न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. 2009 च्या शिक्षेनंतर शायनी आहुजाला 2011 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.  

5/7

फरदीन खान :

 बॉलिवूड अभिनेता फरदीन खानला मुंबई पोलिसांनी 2001  मध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक केली होती.  3 दिवसांनी सुटका झाली आणि 2012 मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने त्याची खटल्यातून मुक्तता केली.

6/7

सूरज पांचोली :

दिवंगत अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सूरज पांचोलीला आयपीसी कलम ३०६ अंतर्गत तुरुंगात टाकण्यात आलं होतं. 1 जुलै 2013 रोजी त्याला जामीन मंजूर करण्यात आला आणि अद्याप अंतिम निकालाची प्रतीक्षा आहे. 

7/7

राजपाल यादव :

एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी घेतलेल्या सुमारे ५ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी राजपाल यादवला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.