Notice Period पूर्ण करावाच लागतो का? सर्व खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर!

Notice Period Rule for employees : या साऱ्यामध्ये भारतात एका प्रकरणानं संपूर्ण आयटी क्षेत्राचं लक्ष वेधलं आहे. गेल्या काही काळापासून इन्फोसिससह अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवलेला नाही. पदोन्नतीही रोखून धरली आहे. यामध्ये नुकतंच इन्फोसिसचे (infosys) अध्यक्ष रवी कुमार एस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामागचे कारण कंपनीने स्पष्ट केलं नसून आता येत्या काळात इन्फोसिस आणि कॉग्निझंटमध्ये मोठा वाद निर्माण होऊ शकतो.   

Dec 29, 2023, 16:00 PM IST

Notice Period Rule for employees : जागतिक आर्थिक मंदी आणि मोठ्या संख्येनं होणारी नोकरकपात सध्या एक महत्त्वाची समस्या होऊन बसली आहे. त्यातच आता जास्त पगार, जास्त सुविधा आणि मनाजोगं काम या साऱ्याच्या शोधात तरुणाई मोठ्या प्रमाणात नोकरी बदलण्याचा निर्णय सातत्यानं घेताना दिसत आहे. 

1/7

अटींची पूर्तता

Notice Period Rule employees should know this as its a concern of legal action

दोन्ही बड्या कंपन्यांचा हा वाद नेमका कोणता वळणावर जातो याकडे आता IT क्षेत्राचं लक्ष असतानाच नोकरीचा राजीनामा आणि त्याभोवती फिरणाऱ्या शंका, प्रश्न या साऱ्याची चर्चा होणंही तितकंच महत्त्वाचं. नोकरीवरील अमुक एका पदाचा राजीनामा दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी नोटीस पिरियडदरम्यान कामावर हजेरी लावणं अपेक्षित असतं. काही कंपन्यांमध्ये हा नियम शिथिल केला जातो. पण, इथंही कर्मचाऱ्यांडून काही अटींची पूर्तता करून घेतली जाते.   

2/7

कंपनीच्या पॉलिसी आणि अटी

Notice Period Rule employees should know this as its a concern of legal action

नोटीस पिरियडदरम्यान कंपनीच्या नियमांचं पालन न करणं कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचं नसतं. कंपनीत काम सुरु करण्याआधीच दिल्या जाणाऱ्या कागदपत्रांमध्ये यासंदर्भातील अटींचाही समावेश असतो. या नियम व अटी व्यवस्थित वाचून त्या लक्षात ठेवा.   

3/7

नोटीस पिरियड कालावधी

Notice Period Rule employees should know this as its a concern of legal action

नोटीस पिरियचा उल्लेख कंपनी करारपत्रामध्येच करते. याचा किमान अवधी 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत असतो. अनेकदा कायमस्वरुपी पगारावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा कालावधी 2 ते 3 महिन्यांचाही असू शकतो. करारावर तुम्ही सही केली असल्याच नोटिस पिरीयड पूर्ण करणं अपेक्षित असतं. कोणतीही कंपनी कर्मचाऱ्यांवर नोटीस पिरियडसंदर्भात दबाव टाकू शकत नाही. नोटिस पीरियड पूर्ण न करण्य़ासंबंधीच्या काही तरतूदींचाही उल्लेख सुरुवातीलाच सहीसाठी देण्यात येणाऱ्या कागदपत्रांमध्ये असतो.   

4/7

नोटीस पीरियवर काम न केल्यास काय?

Notice Period Rule employees should know this as its a concern of legal action

नोटीस पिरीयडच्या दरम्यान तुम्ही तुमच्या सुट्ट्या अॅडजस्ट करण्याचा पर्यायही निवडू शकता. इतकंच नव्हे तर, पगार सरेंडर करण्याचाही पर्यायही कंपनी देते. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी नोटिस पिरियड Buy Out सुद्धा करतात.   

5/7

भारतीय संविधान काय सांगतं?

Notice Period Rule employees should know this as its a concern of legal action

भारतीय संविधान देशातील प्रत्येत नागरिकाला त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी निवडण्याचं स्वातंत्र्य देत असून, याविरोधात जाणारी कोणतीही तरतूद गैर आहे. त्यामुळं तत्सम मसुदा किंवा नोटीस स्वीकारणं, किंवा न स्वीकारणं असा उल्लेख करणं संवैधानिक हक्कभंग मानलं जाईल. त्यामुळं कंपनी तुम्हाला नोटीस पिरियडमधील तत्सम संदर्भ दाखवून धमकावण्याचा प्रयत्न करु शकत नाही. थोडक्यात संपूर्ण नोटीस पिरियडसाठी कंपनी तुम्हाला बांधिल ठरवू शकत नाही.   

6/7

शेवटच्या दिवसापर्यंत काम करण्याचा सल्ला

Notice Period Rule employees should know this as its a concern of legal action

नोटीस पिरियडचे नियम अनेकदा संस्थांनुसार बदलत असले आणि असा दबाव कंपनीला टाकता येणार नसला तरीही कर्मचाऱ्यांनी संस्थेप्रती असणारा प्रमाणिकपणा आणि भविष्यात त्याच कंपनीमध्ये परतण्याच्या संधींची शक्यता पाहता नोकरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम करण्याचा सल्ला अनेक अनुभवी मंडळी देतात. 

7/7

कोड ऑफ कंडक्टचे नियम

Notice Period Rule employees should know this as its a concern of legal action

एका संस्थेत काम करत असताना कोड ऑफ कंडक्टचे नियम ओलांडणं, कंपनीसंदर्भातील गोपनीय माहिती चुकीच्या पद्धतीनं कंपनीबाहेर ( प्रतिस्पर्ध्यांपर्यंत) पोहोचवणं, इनसाईड ट्रेडिंग करणं या आणि अशा गंभीर कृत्यांसाठीही कर्मचाऱ्यांवर कठोर, वेळ पडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे हक्क कंपनीकडे राखीव असतात.