केवळ एका SMSद्वारे जाणून घ्या तुमचा PF बॅलेंस

पीएफ PF खातेधारकांना आपल्या खात्यातील रक्कमेबाबत माहिती करणं आता अधिक सोप्प झालं आहे. आतापर्यंत ऑनलाईन बॅलेन्स चेक करणं किंवा पासबुक डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध होती. 

Feb 13, 2020, 19:18 PM IST

पण आता केवळ एका एसएमएसद्वारे  SMS पीएफ खात्यातील रक्कम जाणून घेता येऊ शकते. या सुविधेसाठी कर्मचाऱ्यांना आपला यूएएन UAN नंबर माहित असणं आवश्यक आहे. 

1/8

पीएफची रक्कम जाणून घेण्यासाठी, रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुनच एसएमएस करावा लागेल. एसएमएसद्वारे १० भाषांमध्ये पीएफ बॅलेन्सची माहिती घेता येऊ शकते. इंग्रजी, हिंदी, तेलुगू, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि बंगाली भाषेमध्ये माहिती मिळू शकते.

2/8

यूएएन नंबर असल्यास, रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन EPFOHO UAN यासह ज्या भाषेतून माहिती हवी आहे, त्या भाषेची पहिली तीन अक्षर टाईप करुन 7738299899 या क्रमांकावर पाठवावी लागतील. इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास EPFOHO UAN ENG असं टाईप करुन दिलेल्या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. 

3/8

ही प्रक्रिया करताना कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास 1800118005 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.  

4/8

'ईपीएफओ'कडून यूएएन क्रमांक देण्याची सुविधा आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदल्यास त्याला पीएफ खातं बदलण्याची आवश्यकता नाही. यूएएन क्रमांकाद्वारे, कर्मचारी आपलं पीएफ खातं नव्या कंपनीमध्ये ट्रान्सफर करु शकतो.

5/8

यूएएन नंबरबाबत माहिती नसल्यास, http://uanmembers.epfoservices.in/check_uan_status.php या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर एक नवं पेज ओपन होईल. त्यात नाव, शहर, इस्टॅब्लिशमेंट कोड आणि पीएफ अकाऊंट नंबर लिहून, 'चेक स्टेटस' बटणवर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर, यूएएन नंबर मिळाला आहे की नाही याबाबत माहिती मिळेल. यूएएन क्रमांक मिळाला नसल्यास कंपनीकडून याबाबत माहिती मिळवा. यूएएन क्रमांक मिळाला असल्यास तो ऍक्टिव्हेट करा.  

6/8

कंपनीकडून यूएएन क्रमांकाबाबत माहिती घेऊन तो ऍक्टिव्हेट करावा लागेल. ऍक्टिव्हेट करण्यासाठी http://uanmembers.epfoservices.in/index.php?accesscheck=%2Fhome.php या लिंकवर क्लिक करा. नवीन ओपन होणाऱ्या पेजवर  activate your UAN वर क्लिक करा.  

7/8

लिंकवर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल. ज्यात यूएएन नंबर, राज्य, शहर, इस्टॅब्लिशमेंट आणि पीएफ अकाऊंट नंबर टाईप करावा लागेल. संपूर्ण माहिती भरल्यानंतर व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘GET PIN’ वर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर ५ मिनिटांच्या आत एक पिन नंबर येईल, जो फॉर्ममध्ये भरुन सबमिट करावं लागेल.

8/8

सबमिट केल्यानंतर एक विंडो ओपन होईल. ज्यात नाव, वडिलांचं नाव, कंपनीचं नाव, यूएएन नंबर, जन्मतारीख लिहिलेली असेल. यात यूएएन अकाऊंट लॉगिन करुन एक पासवर्ड टाकावा लागेल. सोबतच ई-मेल आयडीही टाकावा लागेल. त्यानंतर सबमिट बटणवर क्लिक केल्यानंतर एक ई-मेल येईल, ज्यात ऍक्टिव्हेशन लिंक असेल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ईपीएफओच्या वेबसाईटचं पेज ओपन होईल, ज्यावर ई-मेल आयडी कन्फर्मेशनचा मेसेज मिळेल. त्यानंतर http://uanmembers.epfoservices.in/ लिंकवर क्लिक करुन यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावं लागेल.