close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

साराच्या‌ वाढदिवसासाठी 'तो' थेट‌ पोहोचला बँकॉकला

नुकताच साराने तिचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. 

Aug 13, 2019, 13:07 PM IST

मुंबई : कमी काळात बॉलिवूडमध्ये वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री सारा अली खानच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दिग्दर्शक डेविड धवन यांनी साराला एक खास भेट दिली. 'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या साराचे नाव अभिनेता कार्तिकसोबत जोडण्यात येत आहे. नुकताच साराने तिचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. सोमवारी साराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्तिक बँकॉकमध्ये पोहोचला होता. याच वेळेसचे काही फोटो त्याने स्वत:च्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

1/5

सोमवारी साराने तिचा २४वा वाढदिवस साजरा केला.   

2/5

कार्तिक आणि सारा 'लव आज कल २' चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. 

3/5

'लव आज कल २' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांचा किसिंग सीन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. 

4/5

'लव आज कल २' चित्रपटानंतर ती अभिनेता वरूण धवनसोबत 'कुली नंबर १' मध्ये भूमिका साकारणार आहे. 

5/5

साराच्या 'सिम्बा' चित्रपटाने सुद्धा चाहत्यांच्या मना अधिराज्य गाजवले. त्याचप्रमाणे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा विक्रमी कमाई केली होती.