close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आणखी एका आलियाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

आलिया फर्निचरवाला 'जवानी जानेमन' चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

Jun 17, 2019, 11:37 AM IST

मुंबई : आता बघायला गेलं तर बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचं वादळ आहे. अनेक बॉलिवूड कलाकांरांच्या मुलांची पाऊले अभिनय क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत. जान्हवी कपूर, सारा अली खान या दोघींनंतर चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे चांगलीच चर्चेत आहे. त्यामुळे 'अभी तो स्टार किड्स का जमाना हैं...' असं म्हणायला हरकत नाही. लवकरच बॉलिवूडमधील ग्लॅमरस अदाकारा पूजा बेदीची मुलगीही बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावणार आहे. आलिया फर्निचरवाला 'जवानी जानेमन' चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

 

1/5

आणखी एका आलियाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

आणखी एका आलियाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

आलिया सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो पोस्ट करत असते. तिचे काही फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

2/5

आणखी एका आलियाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

आणखी एका आलियाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

आलिया लवकरच 'जवानी जानेमन' चित्रपटात अभिनेता सैफ अली खानसह झळकणार आहे. वडील आणि मुलगी यांच्या नात्याभोवती चित्रपटाची कथा फिरत आहे. चित्रपटात आलिया अभिनेता सैफ अली खानच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.   

3/5

आणखी एका आलियाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

आणखी एका आलियाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

जॅकी भगनानी यांच्या 'पूजा एंटरटेनमेंट', सैफ अली खानचा 'ब्लॅक नाइट' आणि जय शेवक्रमणि यांची 'नार्थन लाइट्स फिल्म्स' यांच्या द्वारे चित्रपट निर्मित करण्यात येणार आहे. 

4/5

आणखी एका आलियाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

आणखी एका आलियाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

आलिया अभ्यासात फार हुशार आहे. सध्या ती ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत आहे. याशिवाय तिला हॉकी, फुटबॉल आणि स्विंमिग करण्यात विशेष रस आहे. 

5/5

आणखी एका आलियाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

आणखी एका आलियाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

पूजा बेदीने १९९४ साली फरहान फर्नीचरवाला सोबत लग्न केले होते. २००३ साली हे दोघे एकमेकांपासून विभक्त झाले.